Join us

Maharashtra Weather Update : वातावरण निवळणार, थंडी वाढणार, पावसाची शक्यता नाही, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 18:57 IST

Maharashtra Weather Update : आजपासुन पुढील ३ दिवस म्हणजे गुरुवार दि. २ जानेवारीपर्यंत ऊबदार वातावरण (Climate Change) हळूहळू कमी होत जाईल.

Maharashtra Weather Update : गेल्या आठ दिवसापासून राज्यात ढगाळ हवामान (Cloudy Weather), गारठ्यासह उबदार वातावरण अनुभवयास मिळत होते. त्यामुळे पिकांवरही प्रभाव जाणवत होता. मात्र आता यात बदल होऊन पुन्हा थंडी जाणवण्यास सुरवात होणार असल्याचे मत जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले आहे.                                         आजपासुन पुढील ३ दिवस म्हणजे गुरुवार दि. २ जानेवारीपर्यंत ऊबदार वातावरण (Climate Change) हळूहळू कमी होत जाईल. शुक्रवार दि. ३ जानेवारी पासून  त्यापुढील पाच दिवसासाठी म्हणजे मंगळवार दि. ७ जानेवारी पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात थंडी जाणवण्याची शक्यता आहे. 

त्यातही विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra Weather) नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, नगर तर उत्तर विदर्भातील छ.संभाजीनगर, अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात त्या पाच दिवसात थंडीचा प्रभाव अधिक राहील, असे वाटते. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही. 

- माणिकराव खुळे,Meteorologist (Retd.),IMD Pune.

टॅग्स :हवामानशेती क्षेत्रशेतीपाऊस