Lokmat Agro >हवामान > Maharashtra Weather Update : पुढील आठवडाभर थंडी कमी, तापमान वाढणार, नेमका कशाचा परिणाम? 

Maharashtra Weather Update : पुढील आठवडाभर थंडी कमी, तापमान वाढणार, नेमका कशाचा परिणाम? 

Latest News maharashtra weather update fenjal cyclone effect Less cold and temperature will rise for next week | Maharashtra Weather Update : पुढील आठवडाभर थंडी कमी, तापमान वाढणार, नेमका कशाचा परिणाम? 

Maharashtra Weather Update : पुढील आठवडाभर थंडी कमी, तापमान वाढणार, नेमका कशाचा परिणाम? 

Maharashtra Weather Update : काल (शनिवार दि. ३० नोव्हेंबर ला) रात्री ११ वाजता उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पोंडिचेरी जवळ आदळले. त्यामुळे..

Maharashtra Weather Update : काल (शनिवार दि. ३० नोव्हेंबर ला) रात्री ११ वाजता उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पोंडिचेरी जवळ आदळले. त्यामुळे..

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Weather Update : बं. उपसागरात केवळ, थोड्याच कालावधीसाठी, नांव धारण करण्यापूरते, अगदीच प्राथमिक अवस्थेत रूपांतरित झालेले व फारच धिम्या गतीने मार्गक्रमण करत असलेले 'फिंजल' चक्रीवादळ (Fenjal Cyclone) काल (शनिवार दि. ३० नोव्हेंबर ला) रात्री ११ वाजता उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पोंडिचेरी जवळ आदळले. 

'फिंजल' चक्रीवादळ (Fenjal Cyclone) आदळताच लगेचच विकसनाच्या उलट पायरीने झुकत चक्रीवादळ (cyclone Effect) कमकुवत होत त्याचे आज हवेच्या अतितीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर झाले आहे. त्याच्या प्रेरित परिणामातून, महाराष्ट्रात २ ते ४ डिसेंबर (सोमवार ते बुधवार) असे तीन दिवस केवळ ढगाळ वातावरण राहून, झालाच तर, भाग बदलत, अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
               
विशेषतः हा परिणाम, उद्या सोमवारी (२ डिसेंबर ला) दक्षिण महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या महाराष्ट्राच्या अकरा जिल्ह्यात अधिक जाणवेल. तर मंगळवार-बुधवारी (३ व ४ ला) नांदेड, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या चार जिल्ह्यात अधिक जाणवेल असे वाटते.
           
 थंडी कशी राहील?
                                       
उत्तर भारतातून संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात थंडी घेऊन येणारे थंड व कोरड्या उत्तरी वाऱ्यांना, बं उपसागरातून 'फिंजल' चक्रीवादळाच्या बाह्यपरिघ फेरीतून, एकदम काटकोनातून म्हणजे पूर्वे दिशेकडून  लोटलेल्या आर्द्रतायुक्त वाऱ्यामुळे अटकाव केला जात आहे, व दमटपणा काहीसा वाढण्याची शक्यता आहे.
            
त्यामुळे कार्तिक आमावस्या ते चंपाषष्टी (रविवार दि.१ ते शनिवार दि.७ डिसेंबर) पर्यन्तच्या आठवड्यात पहाटेच्या किमान व दुपारच्या कमाल अशा दोन्हीही तापमानात किंचितशी वाढ होवून संपूर्ण महाराष्ट्रात आठवडाभर काहींशी थंडी कमी होतांना जाणवणार आहे.               
          
सध्याची तापमाने
                                      
सध्या महाराष्ट्रात दुपारचे कमाल तापमान २८ तर पहाटेचे किमान तापमान १२ ते १४ डिग्री सेंटीग्रेडच्या दरम्यान असुन ही दोन्हीही तापमाने हे जवळपास सरासरी इतकी अजूनही जाणवतात. उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात भाग बदलत ही तापमाने अजुन खालवलेली असुन ती सरासरीच्या २ ते ४ डिग्रीने घसरलेली आहेत. 
         
उत्तर महाराष्ट्रातील थंडी -
          
अर्थात उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक तसेच छ.सं.नगर अशा ५ जिल्ह्यात मात्र या वातावरणाचा थंडीवर विशेष परिणाम जाणवणार नसून तेथील थंडी टिकून राहील, असे वाटते.             
             
            
पुढील आठवड्यातील थंडी -
                                                  
आठवड्याभराच्या कालावधीनंतर, म्हणजे रविवार दि. ८ डिसेंबर नंतर थंडीत पुन्हा वाढ व्हावी, अशी अपेक्षा आहे. परंतु सध्या विषववृत्तीय आग्नेय बं. उपसागारात जाणवणारी चक्रीय वाऱ्याची स्थिती आणि त्याचबरोबर फिंजल' च. वादळाचे अरबी समुद्रात प्रवेशणाऱ्या शिल्लक अवशेषाचे विकसन, त्यानंतर घेणारी दिशा, ह्यावरच महाराष्ट्रातील त्यापुढील आठवड्यातील थंडीची स्थिती अवलंबून असेल. बघू या काय घडते, ते! दरम्यानच्या कालावधीत, वातावरणात काही बदल झाल्यास अवगत केले जाईल. 


- माणिकराव खुळे.
Meteorologist (Retd)

Web Title: Latest News maharashtra weather update fenjal cyclone effect Less cold and temperature will rise for next week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.