Maharashtra Weather Update : गुलाबी थंडीची चाहूल (Mercury) लागली असून मागील दोन तीन दिवसांपासून थंडी जाणवण्यास सुरवात झाली आहे. रविवार दि. १७ नोव्हेंबरपासून थंडीत (Cold) हळूहळू होत असलेली वाढ अजूनही आठवडाभर टिकून असण्याची शक्यता जाणवते.
जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आजपासुन पुढील आठवडाभर म्हणजे मंगळवार दि. २६ नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात थंडीसाठी अटकाव करणारे कोणतेही वातावरण नसुन या आठवड्यात आकाश निरभ्रतेतुन सकाळ-संध्याकाळी थंडीत अजुन अधिक वाढ होण्याची शक्यता जाणवते.
सध्या महाराष्ट्रात दुपारचे कमाल तापमान ३१ तर पहाटेचे किमान तापमान १५ ते १६ डिग्री सेंटीग्रेडच्या दरम्यान असुन ही दोन्हीही तापमाने हे जवळपास सरासरीपेक्षा एक ते दोन डिग्रीने खालावलेले आहेत.
मंगळवार दि. २६ नोव्हेंबरनंतर म्हणजे आठवड्यानंतरही थंडीतील सातत्य हे टिकून असण्याची शक्यता ही आहेच, परंतु त्या संदर्भातील खुलासा त्यावेळच्या वातावरणीय अवस्थेनुसारच केलेले योग्य ठरेल, असे वाटते.
- माणिकराव खुळे.
Meteorologist (Retd)
IMD Pune.