Join us

Marathwada Rain Update : पुढील चार दिवस मराठवाड्यात पाऊस कसा असेल? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 10:17 PM

Marathwada Rain Update : मराठवाडयात 21 सप्टेंबरपासून ते 24 सप्टेंबरपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

Marathwada Rain Update : प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात  (Marathwada Rain) पुढील चार दिवसात आकाश अंशत: ढगाळ ते ढगाळ राहणार आहे. उद्यापासून म्हणजेच 21 सप्टेंबरपासून ते 24 सप्टेंबरपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात सविस्तर पावसाचा अंदाज..... 

दिनांक 21 सप्टेंबर रोजी नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव व लातूर जिल्हयात (Rain Update) तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 22 सप्टेंबर रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 

दिनांक 23 सप्टेंबर रोजी नांदेड, छत्रपती संभाजी नगर, जालना, धाराशिव व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.  दिनांक 24 सप्टेंबर रोजी जालना, छत्रपती संभाजी नगर, बीड व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 

पुढील तीन ते चार दिवसात.... 

मराठवाडयात पुढील तीन ते चार दिवसात कमाल तापमानात व किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 20 ते 26 सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त तर दिनांक 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :मराठवाडापाऊसहवामानशेती क्षेत्रशेती