Join us

Maharashtra Monsoon Update : मान्सून कर्नाटक, गोव्यापर्यंत, महाराष्ट्रात कधीपर्यंत येईल? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 7:15 PM

Maharashtra Monsoon Update : येत्या आठवडाभरात मान्सून महाराष्ट्रात (Maharashtra Rain) दाखल होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. 

Maharashtra Monsoon Update : सर्वदूर पावसाची ओढ लागली असून मान्सून (Monsoon) केरळातून पुढे सरकला आहे. लवकरच महाराष्ट्रात (maharashtra Monsoon) दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सद्यस्थितीत मान्सून कुठपर्यंत पोहचला आहे? महाराष्ट्रात कधीपर्यंत पोहचणार आहे? याबाबत उत्तरे जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. त्यानुसार येत्या आठवडाभरात मान्सूनमहाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.                मान्सून कुठपर्यंत पोहोचला?                 मान्सून त्याच्या सरासरी तारखेप्रमाणे आज गोवा, दक्षिण कर्नाटक,दक्षिण आंध्रप्रदेश पर्यन्त पोहोचला. मान्सून पुढे सरसावण्यासाठी अनुकूल वातावरण जाणवत आहे. काल मंगळवार दि. ४ जूनला महाराष्ट्रातील बराचश्या भागात तुरळक ठिकाणी मान्सून पूर्व वळीव पावसाने हजेरी लावली.              

मान्सून महाराष्ट्रात कधीपर्यंत पोहोचण्याची शक्यता?                     आजपासुन, सोमवार दि. १० जूनपर्यंतच्या पाच दिवसादरम्यान महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग रत्नागिरी, पुणे दक्षिण, नगर दक्षिण, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, जालना, बीड, धाराशिव, लातूरपर्यंतच्या १२ जिल्ह्यात व लगतच्या जिल्हा परिसरात मान्सून कधीही हजेरी लावण्याची शक्यता जाणवते. तत्पूर्वी मान्सूनपूर्व जोरदार वळीव पावसाची दाट शक्यता जाणवते.                 महाराष्ट्रातील उर्वरित २४ जिल्ह्यात मान्सूनपूर्व वळीव पावसाची शक्यता जाणवते. सध्याच्या आठवड्यातील पावसाची तीव्रता कशी असु शकते. पावसाची तीव्रता पाहता मुंबईसह संपूर्ण कोकण, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा १७ जिल्ह्यात ७ जूनपासून मध्यम तर ९ जूनपासून जोरदार पावसाची शक्यता जाणवते.  

टॅग्स :हवामानमोसमी पाऊसमहाराष्ट्रपाऊसशेती