Join us

Nashik Rain : मुंबईत जोरदार पाऊस, नाशिक जिल्ह्यासाठी काय आहे पावसाचा इशारा? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 4:33 PM

Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) काही भागात जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता मुंबई वेधशाळेने वर्तवली आहे. 

Nashik Rain : एकीकडे मुंबईत जोरदार पाऊस (mumbai Rain) सुरु असून नाशिक जिल्ह्यासाठी (Nashik District) देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज ०८ जुलै २०२४ रोजी काही भागात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस व सोसाट्याचा वारा (४० ते ५० किमी प्रति तास) वाहण्याची शक्यता तर  दि. ०९ जुलै २०२४ रोजी जिल्ह्यातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस व सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे. तसेच दि. ११ जुलै २०२४ रोजी घाट क्षेत्रातील काही भागात जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता मुंबई वेधशाळेने वर्तवली आहे. 

नाशिक जिल्ह्यातील (Nashik Rain) काही भागात आज आणि उद्या (08 आणि 09 जुलै) मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट जोरदार पाऊस सोसाट्याचा वारा साधारण 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेग. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व सोसाट्याचा वारा. तर उद्या 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वारा वाहण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर 11 जुलै रोजी नाशिक जिल्ह्यातील घाट क्षेत्रातील काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

सामान्य सल्लाजर शेतकरी शेतात असतील आणि त्यांना कोणताही निवारा मिळाला नसेल तर त्या परीसरातील सर्वात उंच वस्तू टाळा. जर फक्त तुरळक झाडे जवळपास असतील तर सर्वात चांगले संरक्षण म्हणजे उघड्यावर दबा धरून बसावे (आपले पाय पोटाशी व हात कानावर आणि डोळे झाकावे म्हणजे शरीराचा आकार कमी करणे). विद्युत उपकरणे किंवा वायर/केबल चा संपर्क टाळा. जे धातू किंवा इतर पृष्ठभाग विद्युत वाहक आहेत, त्यापासून कोणत्याही धातू-ट्रॅक्टर, शेतीची उपकरणे आणि दुचाकींचा संपर्क दूर ठेवा.

कृषी सल्ला

अशावेळी रोपवाटिकेत मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येण्याची शक्यता असते. खरीप भात, नाचणी, वरई व कांदापिकांच्या पेरणी केलेल्या रोपवाटिकेत पाणी साचले असल्यास त्वरित बाहेर काढणे गरजेचे आहे. पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. त्याकरिता पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य पध्दतीने चर काढावेत. पाणी साचून राहिल्यामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येईल.

संकलन : विभागीय संशोधन केंद्र आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र, इगतपुरी

टॅग्स :पाऊसहवामाननाशिकमुंबई मान्सून अपडेट