Join us

Nashik Dam Discharged : नाशिकहून जायकवाडीला 'इतके' पाणी रवाना, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 3:02 PM

Nashik Dam Discharged : जायकवाडीकडे सोमवारपर्यंत सुमारे २५ दशलक्ष घनफूट इतके पाणी रवाना झाले आहे.

Jayakwadi Dam : गेल्या पाच दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधारेमुळे ९ धरणे शंभर टक्के भरली आहेत. तर ७ धरणे ८० टक्क्यांपेक्षा जास्त भरल्याने १७ धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे जायकवाडीकडे सोमवारपर्यंत सुमारे २५ दशलक्ष घनफूट इतके पाणी रवाना वाकी झाले आहे. जिल्ह्यात सुरगाणा, पेठसह त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. 

सोमवारीही या तालुक्यांमध्येही पावसाचा जोर कायम राहिला. गेल्या २४ तासांमध्ये सुरगाणा तालुक्यात १८३ किलोमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली असून, पेठमध्ये १०० तर त्र्यंबकेश्वरी ८६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. कळवण आणि दिंडोरी येथेही ७९ व ७८ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून, या पाच तालुक्यांत अतिवृष्टीची परिस्थिती आहे. गंगापूरसह अन्य धरण समूहांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने गोदावरीसह अन्य नद्यांमधील पाणीपातळी कमालीची वाढली आहे. 

कोपरगाव तालुक्यासह क्यासह नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. नाशिक जिल्ह्यातील १७ धरणातून सुमारे ७० हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. आतापर्यंत २५ टीएमसी पाणी मराठवाड्यातील जायकवाडी धरणात जमा झाले असून जायकवाडीचा साठा ४५ टक्क्याच्यावर पोहोचला आहे.

नाशिक धरणांचा विसर्ग 

धरणांतील विसर्ग पाहता गंगापूर धरणातून 9 हजार 540 क्यूसेक, दारणा धरणातून 10 हजार 120 क्यूसेक, भावली धरणातून 721 क्यूसेक, भाम धरणातून 22 हजार 170 क्यूसेक, गौतमी गोदावरी धरणातून 04 हजार 608 क्यूसेक, वाकी धरणातून 945 क्युसेक, कडवा धरणातून 04 हजार 936 क्युसेक, नांदूरमध्यमेश्वर धरणातून 69 हजार 367 क्युसेक होळकर पुलाखालून 9470 क्यूसेक, पालखेड धरणातून 17 हजार 731 क्यूसेक, ओझरखेड धरण 3170 क्यूसेक तर करंजवण धरण 06 हजार 480 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

टॅग्स :जायकवाडी धरणगंगापूर धरणशेती क्षेत्रहवामान