Join us

Nashik Dam Storage : नाशिकच्या गंगापूर धरणांत किती पाणी? जायकवाडीकडे किती पाणी रवाना? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2024 5:27 PM

Gangapur Dam : नाशिक जिल्ह्यातील पाच धरणे शंभर टक्के भरली आहेत तर सहा धरणांतील पाणीसाठा 80 टक्क्यांच्या पुढे गेला आहे.

Gangapur Dam :नाशिक जिल्ह्यात (Nashik district) तीन दिवस संततधार हजेरी लावल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाने धरण क्षेत्रात केलेल्या बॅटिंगमुळे जिल्ह्यातील पाच धरणे शंभर टक्के भरली आहेत तर सहा धरणांतील पाणीसाठा ८० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. यादरम्यान नाशिकमधून चार दिवसांत तब्बल १५ टीएमसी पाणी जायकवाडीकडे (Jayakwadi Dam) रवाना झाले आहे. तर गंगापूर धरणात आजमितीस ८५. ३३ टक्के साठा उपलब्ध झाला आहे. 

चार दिवस धुवाधार बरसल्यानंतर गेल्या चोवीस तासांत पावसाने (Rain) विश्रांती घेतली आहे. पेठ, सुरगाणा, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) परिसरातही पावसाने विश्रांती घेतली असून, श्रावणसरींचा आनंद पर्यटक अनुभवत आहेत. चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी २.५ तर शहरात सुमारे २ मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे धरणांतील पाणीसाठा (Gangapur Dam) वाढला असून, काही धरणांमधून विसर्ग अद्यापही सुरू आहे. त्यात गंगापूर, भावली, वालदेवी, नांदूर, मध्यमेश्वर, हरणबारी आणि केळझर धरणाचा समावेश आहे. यातील गंगापूर धरण वगळता काही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. 

गंगापूर धरण ८५. ३३ टक्के भरले असून, गौतमी गोदावरी ८९.९४ टक्के, आळंदी ९१.५ टक्के, वाघाड ८४.४० टक्के, दारणा ८७.१६ टक्के तर मुकणे ५६.६८ टक्के भरले आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून दोन महिन्यांत अनेक तालुक्यांमध्ये सरासरीहून खूपच कमी पाऊस झाल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. त्यामुळे सर्वच जण पावसाची वाट पाहत होते. गेल्या पाच दिवसांपासून पावसाने जिल्ह्यावर कृपा केली असून त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, इगतपुरी, इगतपुरी पेठ, दिडोरी आणि कळवण तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये सलग तीन दिवस १०० मिमीहून अधिक पाऊस झाल्याने गंगापूर धरणातील पाणीसाठा वेगाने वाढला होता.

धरणांतून विसर्ग सुरूनाशिक जिल्ह्यातील कालवे, धरणांतून विसर्ग कायम असून, त्यात दारणा २००१, भावली २९०, भाम ८२०, वालदेवी १०७, नांदूरमध्यमेश्वर ६३१०, गौतमी गोदावरी ३०१, गंगापूर १५२८, होळकर पुल २४३९ असा विसर्ग सुरू आहे. विसर्ग होत असतांना नाशिकमधून जायकवाडीकडे तब्बल १५ टीएमसी पाणी गेले आहे.

 

टॅग्स :गंगापूर धरणजायकवाडी धरणनाशिकपाऊसपाणी