Lokmat Agro >हवामान > Nashik Dam Storage : नाशिक जिल्ह्यातील धरणांत 8.93 टक्के पाणी शिल्लक, आठ धरणे कोरडी 

Nashik Dam Storage : नाशिक जिल्ह्यातील धरणांत 8.93 टक्के पाणी शिल्लक, आठ धरणे कोरडी 

Latest news nashik dam storage 8.93 percent water remaining in dams of Nashik district | Nashik Dam Storage : नाशिक जिल्ह्यातील धरणांत 8.93 टक्के पाणी शिल्लक, आठ धरणे कोरडी 

Nashik Dam Storage : नाशिक जिल्ह्यातील धरणांत 8.93 टक्के पाणी शिल्लक, आठ धरणे कोरडी 

Nashik Dam Storage : नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात केवळ 22.61 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

Nashik Dam Storage : नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात केवळ 22.61 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Gangapur Dam : राज्यभरात पाणीटंचाईचे (water Shortage) संकट गडद होत असून दिवसेंदिवस पाणीसाठा जमिनीशी घट्ट होत चालला आहे. जिकडे तिकडे पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ महिलांवर येऊन ठेपली आहे. नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) धरणांनी देखील तळ गाठला असून आजमितीस जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 8.93 टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यात नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात केवळ 22.61 टक्के पाणीसाठा (Water Storage) शिल्लक आहे. मागच्या वर्षीचा विचार केला तर जवळपास 38 टक्के जलसाठा उपलब्ध होता.

आज जून महिन्याचे चार दिवस उलटून गेले असून शेतकरी, जनता मान्सूनच्या (Monsoon 2024) प्रतीक्षेत आहेत. विहिरी, नद्या, नाले, झिरे आटून गेले आहेत. जमिनीची भूजल पातळी खालावली असून हातपंपांना देखील पाणी येत नसल्याचे चित्र आहे. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र आता धरणांनी तळ गाठल्याने पाण्यासाठी दाहीदिशा भटकाव्या लागत आहेत. महिनाभरापूर्वी गंगापूर धरणातून गाळ काढण्याचे काम करण्यात आले. पुढील वर्षी काही प्रमाणात पाण्याची साठ्वणक्षमता वाढणार असल्याचे सांगण्यात आले. सद्यस्थितीत गंगापूर धरणात  22.61 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

असा आहे धरणसाठा  38  

नाशिक जिल्ह्यात 24 प्रकल्प असून मागील आठवड्यात यातील सात छोटी मोठी धरणे कोरडीठाक झाली होती. आजच्या जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार कश्यपी 23.43 टक्के, गौतमी गोदावरी 10.65 टक्के, पालखेड 41.35 टक्के, ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव धरणात शून्य टक्के, दारणा 4.59 टक्के, भावली 0  टक्के, मुकणे 3.65 टक्के, वालदेवी 0 टक्के, नांदूर मध्यमेश्वर 100 टक्के, चणकापुर 4.57 टक्के हरणबारी 7.80 टक्के, केळझर 0.52 टक्के, केळझर 0 टक्के, गिरणा 12.41 टक्के तर माणिकपुंज 0 टक्के अशी काही महत्त्वाची धरण मिळून 8.93 टक्के असा जलसाठा उपलब्ध आहे. तर जवळपास 8 धरणे शून्यावर आहेत. 

Web Title: Latest news nashik dam storage 8.93 percent water remaining in dams of Nashik district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.