Join us

Nashik Dam Storage : नाशिक जिल्ह्यातील धरणे भरली, गंगापूर, भावली, दारणा धरणांत किती पाणी आलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 4:45 PM

Nashik Dam Storage : नाशिक शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असून गंगापूर धरणातून विसर्ग सुरूच आहे.

Nashik Dam Storage : नाशिक शहरासह जिल्ह्यात (Nashik Rain) मुसळधार पाऊस सुरूच असून गंगापूर धरणातून विसर्ग सुरूच आहे. गंगापूर पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन जोरदार पाऊस कायम आहे. शिवाय जिल्ह्यातील इतरही भागात पाऊस सुरू असल्याने धरणे तुडुंब भरली आहेत. आज गंगापूर धरणात (Gangapur Dam) जवळपास 89.84 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील इतर धरणाची स्थिती पाहुयात...

गंगापूर धरण 89.84 टक्के, कश्यपी धरण 82.67 टक्के, गौतमी गोदावरी 94.86 टक्के, आळंदी धरण 100 टक्के, तर पालखेड धरण समूहातील पालखेड धरण 77.34 टक्के, करंजवण धरण 97 टक्के, वाघाड धरण 100 टक्के, ओझरखेड धरण 100 टक्के, पुणे गाव धरण 86.4 टक्के, तिसगाव धरण 100 टक्के, दारणा धरण 93.75 टक्के, भावली धरण 100 टक्के, मुकणे धरण 74.26 टक्के, वालदेवी धरण 100 टक्के, कडवा धरण 86.2 टक्के, नांदूर मधमेश्वर धरण 81.71 टक्के, भोजापुर धरण 100 टक्के, चणकापूर धरण 87.52 टक्के, हरणबारी केळझर धरण 100 टक्के, गिरणा धरण 60 टक्के, पुण्यात धरण 75.11 टक्के, माणिकपुंज 90.15 टक्के असा एकूण जिल्ह्यातील धरणांतील साठा 81.10 टक्के इतका झाला आहे. मागील वर्षी हाच साठा 66.36 टक्के इतका होता. 

या धरणातून विसर्ग

जिल्ह्यातील गंगापूर धरणातून 8428 क्युसेक, गौतमी गोदावरी धरणातून 2560 क्युसेक, पालखेड धरणातून 20 हजार 890 क्युसेक, करंजवण धरणातून 9 हजार 908 क्यूसेक, वाघाड धरणातून 03 हजार 116 क्यूसेक, ओझरखेड धरणातून 04 हजार 952 क्युसेक, पुणेगाव धरणातून 6000 क्युसेक, दारणा धरणातून 12 हजार 178 क्यूसेक,  कडवा धरणातून 03 हजार 110 क्युसेक, चनकापूर धरणातून 16 हजार 128 क्यूसेक तर नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून 62 हजार 371 हजार सर्वाधिक विसर्ग सुरू आहे.

टॅग्स :पाऊसहवामानशेती क्षेत्रशेतीनाशिकगंगापूर धरणनांदूरमधमेश्वर