Nashik Dam Storage : नाशिक जिल्ह्यात (Nashik Dam Storage) अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असून धरणे फुल्ल भरली आहेत. अनेक धरणे ओसंडून वाहत असल्याने धरणांमधून विसर्ग देखील सुरु आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात (Gangapur Dam) ९५ टक्क्यांवर असून ११०६ क्युसेकने विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यातील एकूण २४ प्रकल्पात ९५. ६७ टक्के जलसाठा आहे.
आजच्या जिल्हा प्रशासनाने दिलेल्या पाणीसाठा अहवालानुसार १० धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. तर १२ धरणे शंभरीकडे वाटचाल करीत आहेत. केवळ नागासाक्या धरण अजूनही शुन्य टक्क्यांवर आहे. पालखेड, नांदुरमध्यमेश्वर, दारणा, गिरणा धरणातून विसर्ग सुरु आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील धरणात ७८ टक्के जलसाठा होता. यंदा मात्र धरणे तुडुंब भरली आहेत.
कसा आहे जिल्ह्यातील पाणीसाठा
गंगापूर धरण ९५.९५ टक्के, कश्यपी धरण ९७.२५ टक्के, गौतमी गोदावरी ९४.८६ टक्के, आळंदी धरण १०० टक्के, तर पालखेड धरण समूहातील पालखेड धरण ९१.४२ टक्के, करंजवण धरण ९९.२९ टक्के, वाघाड धरण १०० टक्के, ओझरखेड धरण १०० टक्के, पुणे गाव धरण ९१.६५ टक्के, तिसगाव धरण १०० टक्के, दारणा धरण ९८.३५ टक्के, भावली धरण १०० टक्के, मुकणे धरण ९०.३५ टक्के, वालदेवी धरण १०० टक्के, कडवा धरण ९१.१७ टक्के, नांदूर मधमेश्वर धरण १०० टक्के, भोजापुर धरण ९९.१७ टक्के, चणकापूर धरण ९५.५५ टक्के, हरणबारी, केळझर धरण १०० टक्के, गिरणा धरण ९६.०८ टक्के, पुनद धरण ८९.४३ टक्के, माणिकपुंज १०० टक्के आहे.