Join us

Nashik Dam Storage : गंगापूर धरणात किती पाणी? जाणून घ्या सविस्तर पाणीसाठा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 10:52 AM

Nashik Dam Storage : तर नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर 24 प्रकल्प मिळून 7.59 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

Gangapur Dam : सध्या नाशिक जिल्ह्यात (Nashik District) काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होत असून तर काही भाग अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जून महिना संपत आला असून आता जोरदार पावसाची प्रतीक्षा (rain) आहे. कारण अनेक भागात पेरण्या असल्याने पुरेसा पाऊस नसल्या कारणाने दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. आजमितीस गंगापूर धरणात (Gangapur Dam 17.21 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 

तर नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर 24 प्रकल्प मिळून 7.59 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. अनेक धरणे कोरडीठाक झाली असून सर्वच तालुके जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पुढील काही दिवसात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे धरणे भरण्यास सुरवात होईल. 

सध्याचा पाणीसाठा किती? 

आजच्या जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार कश्यपी 17.12 टक्के, गौतमी गोदावरी 9.08 टक्के, पालखेड 15.77 टक्के, तर मागील तीन आठवड्यापासून  ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव धरणात शून्य टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर दारणा 3.64 टक्के, भावली 0 टक्के, वालदेवी 0 टक्के, मुकणे 2.28 टक्के, नांदूर मध्यमेश्वर 94.55 टक्के, चणकापुर 4.57 टक्के, हरणबारी 8.06 टक्के, केळझर 0.52 टक्के, गिरणा 12.16 टक्के तर माणिकपुंज 0 टक्के अशी काही महत्त्वाची धरण मिळून 7.59 टक्के असा जलसाठा उपलब्ध आहे.

टॅग्स :गंगापूर धरणनाशिकहवामानशेती