Join us

Nashik Dam Storage : गंगापूर, दारणा, गिरणा धरण शंभरीकडे, नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा किती? 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 5:24 PM

Nashik Dam Storage : ऑगस्ट महिन्यात झालेल्या धुवाधार पावसाने नाशिक जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरली आहेत.

Nashik Dam Storage : ऑगस्ट महिन्यात झालेल्या धुवाधार पावसाने नाशिक जिल्ह्यातील (Nashik Rain) धरणे तुडुंब भरली आहेत. आता पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. मात्र अधून मधून पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावत आहेत. आजमितीस जिल्ह्यातील एकूण धरणात जवळपास 94.26 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. जो मागील वर्षी 67.22 टक्के होता. यंदा मात्र धरणांची स्थिती समाधानकारक असल्याचे चित्र आहे. 

नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण (Gangapur Dam) देखील भरले आहे. या धरणातून जायकवाडीला मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे जायकवाडी देखील भरण्याच्या मार्गावर आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण 24 प्रकल्प असून सर्वच धरणे भरली आहेत. गिरणा खोरे धरण समूहातील नागासाक्या, मन्याड धरणे तळाशीच आहेत. या धरणांचा पाणीसाठा चिंतेची बाब आहे. 

जिल्ह्यातील इतर धरणाची स्थिती पाहुयात... 

गंगापूर धरण 94.49 टक्के, कश्यपी धरण 96.87 टक्के, गौतमी गोदावरी 91.76 टक्के, आळंदी धरण 100 टक्के, तर पालखेड धरण समूहातील पालखेड धरण 87.75 टक्के, करंजवण धरण 99.27 टक्के, वाघाड धरण 100 टक्के, ओझरखेड धरण 100 टक्के, पुणे गाव धरण 91.65 टक्के, तिसगाव धरण 100 टक्के, दारणा धरण 95.44 टक्के, भावली धरण 100 टक्के, मुकणे धरण 87.25 टक्के, वालदेवी धरण 100 टक्के, कडवा धरण 86.20 टक्के, नांदूर मधमेश्वर धरण 100 टक्के, भोजापुर धरण 99.17 टक्के, चणकापूर धरण 90.23 टक्के, हरणबारी, केळझर धरण 100 टक्के, गिरणा धरण 96.08 टक्के, पुनद धरण 81.62 टक्के, माणिकपुंज 99.76 टक्के असा एकूण जिल्ह्यातील धरणांतील साठा 94.26 टक्के इतका झाला आहे.

या धरणातून विसर्ग गंगापूर धरणातून 1105 क्युसेक, पालखेड धरण 1696 क्युसेक, करंजवण 903 क्युसेक, पुणेगाव 1300 क्युसेक, दारणा धरण 2071 क्युसेक, कडवा धरण 3292 क्युसेक, नांदूर मधमेश्वर 3962 क्युसेक, गिरणा धरण 4884 क्युसेक तसेच इतर धरणांतून थोड्या क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

टॅग्स :गंगापूर धरणनाशिकशेती क्षेत्रशेतीहवामान