Nashik Rain Update :नाशिक जिल्ह्यातील (Nashik Rain) काही भागात १८ ते २१ ऑगस्ट २०२४ दरम्यान मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस व सोसाट्याचा वारा (३० ते ४० किमी प्रति तास) दाट शक्यता आहे. आज रोजी मुंबई वेधशाळेने हवामान अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार पुढील चार दिवस जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.
सामान्य कृषी सल्ला
विजेचा पूर्वानुमानाकरीता दामिनी मोबाईल अॅपचा वापर करावा. जर शेतकरी शेतात असतील आणि त्यांना कोणताही निवारा मिळाला नसेल तर त्या परीसरातील सर्वात उंच वस्तू टाळा. जर फक्त तुरळक झाडे जवळपास असतील तर सर्वात चांगले संरक्षण म्हणजे उघड्यावर दबा धरून बसावे (आपले पाय पोटाशी व हात कानावर आणि डोळे झाकावे म्हणजे शरीराचा आकार कमी करणे). विद्युत उपकरणे किंवा वायर केबल चा संपर्क टाळा. कोणत्याही धातू-ट्रॅक्टर, शेतीची उपकरणे आणि दुचाकींचा संपर्क दूर ठेवा. जे धातू किंवा इतर पृष्ठभाग विद्युत वाहक आहेत.
जनावरांसाठी पशु सल्ला
प्राण्यांना ट्रॅक्टर आणि इतर धातूंच्या शेतीच्या उपकरणांपासून दूर ठेवा. आपल्या प्राण्यांना झाडाखाली जमू देऊ नका. प्राण्यांकडे लक्ष्य ठेवा आणि त्यांना आपल्या थेट नियंत्रणाखाली ठेवण्याचा प्रयत्न करा. गुरे व शेळ्यांना शैडमध्ये ठेवा आणि त्यांना विजांचा कडकडाटपासून वाचवण्यासाठी प्राण्यांना खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवा. पावसापासून पशुधन व कुक्कुटपक्ष्यांचे साठवलेले पशुखाद्य, चारा व कडब्याचे प्लास्टिक ताडपत्रीने झाकून संरक्षण करावे.
दुभत्या जनावरांना गोठ्यात ठेवा गुरे व शेळ्यांना शेडमध्ये ठेवा आणि त्यांना पावसापासून वाचवण्यासाठी कोरडे अंथरूण (गोणपाट इ.) द्या. पावसाळ्यात जमीन ओली, भुसभुशीत झाल्यामुळे जनावर घसरून त्यांना इजा होऊ शकते. दगड व माती खुरांमध्ये जाऊन बसल्यामुळे जनावराना जखमा होतात. यासाठी खुराची नियमित तपासणी करावी पावसाळ्यात ओलसरपणामुळे खूर खराब झाल्यास त्या वेदनामुळे दुभत्या गाई, म्हशीच्या उत्पादनावर परिणाम होतो.
संकलन : प्रादेशिक हवामान पूर्वानुमान केंद्र, मुंबई , विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी