Join us

Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यात ऑगस्ट अखेरपर्यंत पाऊस कसा असेल? जाणून घ्या सविस्तर  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 1:53 PM

Nashik Rain Update : कारण 'ला-निना' डोकावणार असल्यामुळे सरासरीपेक्षा या महिन्यात पाऊस तसा कमी राहणार आहे.

Nashik Rain Update :  ऑगस्टअखेरपर्यंत नाशिकमध्ये (Nashik Rain) मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. कारण 'ला-निना' डोकावणार असल्यामुळे सरासरीपेक्षा या महिन्यात पाऊस तसा कमी राहणार आहे. घाटमाथ्यावर तिसऱ्या आठवड्यात जोर वाढू शकतो. धरणांच्या क्षेत्रात सरींची हजेरीत सातत्य राहू शकते. पाणलोट क्षेत्रातून काही प्रमाणात आवक होत राहणार आहे, अशी माहिती सेवानिवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

नाशिक शहर व परिसरात पावसाने मागील काही दिवसांपासून (Heavy Rain) मध्यम सरींचा वर्षाव होत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. शनिवारी नाशिकसाठी हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' दर्शविण्यात आला होता. शहरात दुपारी हलक्या सरींनी हजेरी लावली; मात्र सकाळी शहरात ऊन पडले होते; मात्र आडगाव ते मुंबईनाका या भागात दुपारी तीन ते जोरदार सरी बरसल्या. चालू महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नाशिकमध्ये मध्यम पाऊस राहणार आहे, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

पाच दिवस संपूर्ण राज्यासह नाशिकमध्ये मान्सून चांगला सक्रिय राहिल्याचे पहावयास मिळाले होते. शनिवारपासून रविवारी रात्रीपर्यंत २४ तासांत शहरात सुमारे १०५ मिमीपेक्षा जास्त पाऊस पडल्याची नोंद झाली होती. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ या तालुक्यातील घाटमाथ्यावरील भागांमध्ये मध्यम पाऊस सुरू आहे. परंतु पावसाचा जोर पाहिजे तसा नसल्याने धरणांमध्ये पाणलोट क्षेत्रातून होणारी आवकसुद्धा कमी झाली आहे. यामुळे विसर्गही घटविण्यात आला आहे. परिणामी गोदावरीची पातळी आता सामान्य झाली आहे.

जोरदार पावसाची शक्यता कमीचदीर्घपल्ल्याच्या अंदाजाच्या स्थितीनुसार सप्टेंबरमध्येसुद्धा नाशिक व अहमदनगर या दोन जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता तशी कमी राहणार असल्याचे दिसते, असेही खुळे म्हणाले. यामुळे हवामानाची स्थितीमध्ये जर बदल झाला तर नाशिकला पुन्हा जोरदार पाऊस होऊ शकतो. ऑगस्टअखेरपर्यंत नाशिकमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. कारण 'ला-निना' डोकावणार असल्यामुळे सरासरीपेक्षा या महिन्यात पाऊस तसा कमी राहणार आहे. घाटमाथ्यावर तिसऱ्या आठवड्यात जोर वाढू शकतो. 

टॅग्स :पाऊसनाशिकहवामानमोसमी पाऊसशेती क्षेत्र