Join us

Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्याला यलो अलर्ट, 23 ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 12:49 PM

Nashik Rain Update : यात नाशिक जिल्ह्यात (Nashik Rain) २१ ऑक्टोबरपर्यंत येलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार काल सायंकाळी जिल्ह्यातील बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.

Nashik Rain Update : महाराष्ट्रातून परतीच्या पावसाने (Nashik Rain) काढता पाय घेतला असला तरीही अद्याप जोरदार पावसाच्या सरी काही भागात कोसळत आहेत. यात नाशिक जिल्ह्यात २१ ऑक्टोबरपर्यंत येलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार काल सायंकाळी जिल्ह्यातील बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यात अनेक पिकांचे नुकसान झाले. 

मुंबई वेधशाळेने वर्तविलेल्या हवामान अंदाजानुसार पुढील पाच दिवसाचा (Rain Alert) अंदाज लक्षात घेता दि. १९ ते २३ ऑक्टोबर २०२४ दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पाच दिवस हवामान थोडे उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. आकाश पुढील पाच दिवस ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान ३१-३२ डिग्री सें. व किमान तापमान १९-२३ डिग्री सें. दरम्यान राहण्याची शक्यता आहे तसेच वा-याचा वेग ४-८ कि.मी/तास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

हवामानाचा अंदाज आणि इशारा लक्षात घेता नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी दि. १८ ते २१ ऑक्टोबर २०२४ दरम्यान (यलो अलर्ट) घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (३०-४० किमी प्रति तास वेग) वाहण्याची शक्यता आहे.  मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटचा अंदाज लक्षात घेता सल्ला देण्यात येतो कि जनावरांना मोकळे पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे.

शेतकऱ्यांसाठी आवाहन 

दरम्यान जोरदार पावसाचा इशारा लक्षात (दि. १८ ते २१ ऑक्टोबर २०२४) घेता पशुधन, कुक्कुट पक्षी आणि स्वतःचे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटपासून संरक्षण करा. तसेच हलका ते मध्यम पाऊस असल्याकारणाने कापणी व मळणी केलेल्या खरीप पिकांना सुरक्षित जागेवर झाकून ठेवावे. रबी हंगामातील कांदा पिकासाठी रोपवाटिका तयार करावी.मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटपासून पशुधनाचे व स्वतःचे संरक्षण करा. तसेच हलका ते मध्यम पाऊस असल्याकारणाने कापणी व मळणी केलेल्या खरीप पिकांना सुरक्षित जागेवर झाकून ठेवावे.

टॅग्स :नाशिकपाऊसहवामानमोसमी पाऊसशेती क्षेत्र