Join us

Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यासाठी यलो आणि रेड अलर्ट, मुंबई वेधशाळेचा इशारा, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 7:47 PM

Nashik Rain Update : मुंबई वेधशाळेच्या हवामान अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यात येलो अलर्टसह रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Nashik Rain Update : उद्यापासून राज्यात बहुतांश जिल्ह्यात पावसाचा (Rain Alert) अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातही येलो अलर्टसह रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या २४ डिसेंबरपासून ते २६ सप्टेंबरपर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याबाबत मुंबई वेधशाळेने पावसाचा इशारा दिला आहे. 

मुंबई वेधशाळेने  (Mumbai IMD) वर्तविलेल्या हवामान अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यात (Nashik Rain Update) काही ठिकाणी (येलो अलर्ट) दि. २३ सप्टेंबर २०२४ रोजी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि  सोसाट्याचा वारा (३०-४० किमी प्रति तास) वेगाने वाहण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी (येलो अलर्ट ) दि. २४ व २५ सप्टेंबर २०२४ रोजी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस आणि  सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. 

तसेच  दि. २४ व २५ सप्टेंबर २०२४ रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या दोन दिवस मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, जोरदार ते अति जोरदार पाऊस आणि  सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. 

२३ सप्टेंबर : नाशिक जिल्ह्याच्या काही ठिकाणी (येलो अलर्ट) मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (३०-४० किमी प्रति तास) वेगाने वाहण्याची शक्यता आहे. 

२४ व २५ सप्टेंबर : नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी (येलो अलर्ट) मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. 

२६ सप्टेंबर : नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी (रेड अलर्ट) मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट जोरदार ते अति जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :पाऊसशेती क्षेत्रहवामाननाशिक