Lokmat Agro >हवामान > Water Discharged : पालखेड डावा कालव्यातुन बिगर सिंचन आवर्तन, उद्यापासून विसर्ग, वाचा सविस्तर 

Water Discharged : पालखेड डावा कालव्यातुन बिगर सिंचन आवर्तन, उद्यापासून विसर्ग, वाचा सविस्तर 

Latest News Non-irrigation cycle from Palkhed left canal, discharge from 1 june | Water Discharged : पालखेड डावा कालव्यातुन बिगर सिंचन आवर्तन, उद्यापासून विसर्ग, वाचा सविस्तर 

Water Discharged : पालखेड डावा कालव्यातुन बिगर सिंचन आवर्तन, उद्यापासून विसर्ग, वाचा सविस्तर 

Water Discharged : 1 जून 2024 पासून पालखेड डावा कालव्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. 

Water Discharged : 1 जून 2024 पासून पालखेड डावा कालव्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : पालखेड डावा कालव्याद्वारे  मनमाड नगरपरिषद मनमाड, येवला नगरपरिषद येवला (Yeola) तालुक्यातील 38 गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, मध्य रेल्वे मनमाड व ग्रामपंचायत आंबेगांव या शासनमान्य पाणीपुरवठा योजनांना  पाणी पुरवठा करण्यासाठी 1 जून 2024 पासून पालखेड डावा कालव्याचे आवर्तन (water Discharged)  सोडण्यात येणार आहे. 

सध्या नाशिक (Nashik) जिल्ह्यातील धरणसाठा कमालीचा घटला आहे. अनेक गावांना पिण्यासाठी पाणीच नसल्याने अनेक धरणातून आवर्तन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर पालखेड डाव्या कालव्यातून आवर्तन सोडण्यात येणार आहे. सदर आवर्तनाद्वारे देण्यात येणारे पाणी फक्त शासनमान्य  बिगर सिंचन संस्था यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी असून कोणीही सदर पाण्याचा शेतीसाठी किंवा इतर कारणांसाठी उपसा करू नये, असे आवाहन कार्यकारी अभियंता पालखेड पाटबंधारे विभाग नाशिक वैभव भागवत यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

सदर आवर्तन कालावधीत कालव्यालगतचा वीज पुरवठा खंडीत करणे, पोलीस बंदोबस्त पुरविणे याबाबत जिल्हाधिकारी नाशिक यांनी आदेश निर्गमित केले आहे. अनधिकृत पाणी उपसा करण्यांवर पाटबंधारे अधिनियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे  प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Latest News Non-irrigation cycle from Palkhed left canal, discharge from 1 june

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.