Join us

Water Storage : राज्यात 42 टक्केच पाणीसाठा, कोणत्या जिल्ह्यातील धरणात किती पाणी? 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 7:17 PM

राज्यातील जवळपास 3 हजार छोट्या मोठ्या धरणांमध्ये केवळ 42.65 टेक पाणीसाठा शिल्लक आहे.

राज्यातील पाणीसाठ्याबाबत चिंता वाढविणारी बातमी असून सद्यस्थितीत राज्यातील जवळपास 3 हजार छोट्या मोठ्या धरणांमध्ये केवळ 42.65 टेक पाणीसाठा शिल्लक आहे. आज सर्वाधिक 55 टक्के पाणीसाठा कोकण विभागात असून सर्वात कमी पाणीसाठा छत्रपती संभाजीनगर विभागात आहे. मागील वर्षीच विचार केला तर जवळपास 62 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत आज 20 टक्के पाणीसाठा कमी असल्याचे आजच्या अहवळतून समोर आले.  

राज्यात 2994 च्या आसपास धरणे असून यात 138 मोठी धरणे, 260 मध्यम धरणे तर जवळपास 2594 इतक्या लहान आकाराच्या धरणांचा समावेश आहे. आज 15 मार्च रोजी राज्यातील सर्व धरणांमध्ये सुमारे 42.65 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी या दिवशी 42.65 टक्के पाणी शिल्लक होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 टक्के पाणीसाठा कमी आहे. राज्यातील विभागांचा विचार केला तर नागपूर विभागात 52 टक्के, अमरावती विभागात 53 टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात 22 टक्के, नाशिक विभागात 43 टक्के, पुणे 43 टक्के, कोकण विभाग 55 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, म्हणजेच तीन विभाग पन्नास टक्क्याहून अधिक पाणीसाठा इतर तीन विभागात पन्नास टक्क्यांच्या जवळपास देखील पाणीसाठा नसल्याचे चित्र आहे. 

नाशिक विभागाचा विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणामध्ये 46 टक्के, मुळा धरण 38 टक्के, निळवंडे 2 34 टक्के इतका पाणीसाठा आहे. जळगाव जिल्ह्यातील अप्पर तापी हतनूर धरणात 69 टक्के, वाघूर 77 टक्के धरणसाठा आहे. नाशिक जिल्ह्यातील गंगापूर 53 टक्के, गिरणा 32 टक्के, कादवा 28 टक्के, दारणा 27 टक्के, भावली 16 टक्के, वैतरणा 70 टक्क्यांवर आहे. नाशिक जिल्ह्यातील मोठ्या धरणाचा विचार केला तर आजच्या घडीला केवळ 44 टक्के जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत आज  16 टक्क्यांनी कमी असल्याचे दिसते आहे. 

इथे वाचा सविस्तर राज्यातील पाणीसाठा 

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीहवामानपाणीधरणपाणीकपातगंगापूर धरण