Nashik Dam Storage : राज्यात मान्सूनचा पाऊस (Rain) थांबल्याने अनेक भागातील पेरण्या खोळंबल्या असून पाणीसाठा देखील शून्यावर येऊ लागला आहे. राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा नागरिकांना आहे. नदी नाल्यांना पाणी नसल्याने धरणे देखील कोरडी झाली आहेत. आजमितीस नाशिक जिल्ह्यातील (Nashik) धरणात ७.८८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
मान्सूनची प्रतीक्षा सगळ्यांनाच असून धरणाची पाणीपातळी (Dam Storage) कमालीची घटली आहे. नाशिक जिल्ह्यातही पाणीसाठा अल्पसा राहिला असून गंगापूर धरणात केवळ १७.५८ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. त्याचबरोबर इतरही धरणांत पाणी कमी असल्याने सर्वच धरणे पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक धरणे शून्यावर आली असल्याने पावसाची आस लावून आहेत. नेमका कुठल्या धरणात किती पाणीसाठा शिल्लक आहे, हे पाहुयात.....
सध्याचा पाणीसाठा किती?
आजच्या जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार कश्यपी २२.६२ टक्के, गौतमी गोदावरी १०.१७ टक्के, पालखेड १९.३० टक्के, तर मागील आठवडाभरापासून ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव धरणात शून्य टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर दारणा 3.66 टक्के, भावली 0 टक्के, वालदेवी 0 टक्के, मुकणे 3.8 टक्के, नांदूर मध्यमेश्वर १०० टक्के, चणकापुर 4.57 टक्के, हरणबारी ७.९८ टक्के, केळझर ०.३५ टक्के, गिरणा १२.१० टक्के तर माणिकपुंज 0 टक्के अशी काही महत्त्वाची धरण मिळून ७.८८ टक्के असा जलसाठा उपलब्ध आहे.