राज्यातील बहुतांश धरणांतील पाणीपातळी खालावली असून जायकवाडी धरणात केवळ 07 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तर नाशिक जिल्ह्यातही पाणीटंचाईची भीषणता दिवसेंदिवस वाढत असून आजमितीस जिल्ह्यातील धरणांमध्ये 20.84 टक्के पाणीसाठा शिल्लक राहीला आहे. तर गंगापूर धरणात 31. 35 टक्के पाणी शिल्लक राहिले आहे.
राज्यभरात अवकाळी पाऊस बरसत असताना तापमान देखील जीवाची काहिली करणारे आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार आजमितीस गंगापूर धरण समूहात 28.05 टक्के पाणी आहे. मागील वर्षी हाच साठा 37.98 टक्के होता. कश्यपी धरणात 23.87 टक्के, गौतमी गोदावरी धरणात 18.4 टक्के, पालखेड धरण समूहातील पालखेड धरणात 11.64 टक्के, करंजवण धरणात 14.99 टक्के, वाघाड धरणात केवळ 3.95 टक्के पाणी शिल्लक राहिला आहे.
ओझरखेड धरणात 0 टक्के पुणे गाव धरणात 00 टक्के तिसगाव धरणात 0.22 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. दारणा धरणात 25.37 टक्के, भावली धरणात 6.14 टक्के, मुकणे धरणात 24.11 टक्के, नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यात 1.56 टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. गिरणा खोरे धरून समूहातील चणकापूर धरणात 14.96 टक्के हरणबारी धरणात 35.33 टक्के, केळझर धरणात 14.51 टक्के तर नागासाक्या धरणात 00 टक्के तर गिरणा धरणात 21.49 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. एकूणच मागील वर्षी याच दिवशी नाशिक जिल्ह्यातील धरणांत 37.96 टक्के पाणीसाठा होता, तर आजमितीला केवळ 20.14 टक्के असा चिंताजनक पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.