Join us

Jayakwadi Dam : आतापर्यंत नाशिक-नगरमधून जायकवाडीला किती पाणी गेलं? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 1:34 PM

Jayakwadi Dam :

Jayakwadi Dam : नाशिक आणि अहमदनगरच्या धरणांमधून एकूण २८ टीएमसी इतके पाणी १ जूनपासून पैठणच्या जलाश पोहोचल्याने या जलाशयामध्ये ३९ टक्के पाणीसाठा (Jayakwadi Dam Storage उपलब्ध झाला आहे. यात नाशिकमधून २० तर नगरमधून ८ टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला आहे. दरम्यान, गंगापूर आणि दारणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने दोन्ही धरणांच्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आल्याने जायकवाडीच्या दिशेने वेगाने आणखी पाणी सोडले जात आहे. 

गंगापूर धरणांतून (Gangapur Dam) सायंकाळी ७ वाजता ८४२८ क्यूसेक, गौतमी-गोदावरीतून १५३६, दारणातून १४,८१२ व सर्वांचा संकलित म्हणून नांदूरमध्यमेश्वरमधून १५,७७५ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. दरम्यान, नाशिकसह राज्याच्या सर्वच भागांमध्ये येत्या ४८ तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. सध्याच्या स्थितीत विचार केला तर नाशिकच्या २३ प्रमुख प्रकल्पांमध्ये मिळून ८५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

जायकवाडीत सध्या ३९ टक्के म्हणजे २८ टीएमसी इतका जिवंत पाणीसाठा आहे. परंतु अद्यापही नाशिक-नगरची चिंता दूर झालेली नाही. किमान ६५ टक्के साठा पैठण जलाशयात उपलब्ध झाला, तरच वरच्या धरणांतून पाणी सोडण्याची आवश्यकता राहणार नाही, अन्यथा पाणी सोडावे लागेल, असे शासनाचेच आदेश आहेत. दिलासा इतकाच की, पुढील दोन ते तीन दिवस नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने अन् सध्या सुरू असलेल्या विसर्गात वाढ होण्याच्या अंदाजामुळे जायकवाडी पुढील आठवडाभरात ५० टक्के भरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर सप्टेंबरमध्येही चांगला पाऊस झाल्यास जायकवाडी धरणात अपेक्षित पाणीसाठा उपलब्ध होण्यास मदत होईल. 

मराठवाड्यातील धरणात किती पाणी? 

जायकवाडी धरणएकुण::::::: ५६.३९७१ TMC/५४.९०%ऊपयुक्त::::३०.२६०२ TMC/३९.५६%.                                     --------------------------------------------येलदरी: (ऊ)::११.००९ TMC/३८.४९%माजलगाव:(ऊ):०.०० TMC/००.००%पेनगंगा(ईसापुर)(ऊ):२१.२३० TMC/६२.३५%तेरणा::ऊ):::०१.०३६ TMC/३२.१६%मांजरा(ऊ)::::०१.७०१TMC/२७.२२%दुधना:(ऊ)::०१.७२३ TMC/२०.१५%विष्णुपुरी:(ऊ)::२.३०४ TMC/८०.७६%सिध्देश्वर::(उ)::२.०४० TMC/७१.३४%

टॅग्स :जायकवाडी धरणगंगापूर धरणअहमदनगरधरणपाऊसहवामानशेती क्षेत्र