Lokmat Agro >हवामान > शेतकऱ्यांचे पावसाबाबतचे अंदाज अचूक आणि आश्वासक का ठरत असतात? जाणून नेमकं कारण

शेतकऱ्यांचे पावसाबाबतचे अंदाज अचूक आणि आश्वासक का ठरत असतात? जाणून नेमकं कारण

Latest News Traditional rain forecasts made by farmers are still promising see details | शेतकऱ्यांचे पावसाबाबतचे अंदाज अचूक आणि आश्वासक का ठरत असतात? जाणून नेमकं कारण

शेतकऱ्यांचे पावसाबाबतचे अंदाज अचूक आणि आश्वासक का ठरत असतात? जाणून नेमकं कारण

आजही शेतकऱ्यांनी बांधलेले पावसाचे पारंपरिक अंदाज आजही आश्वासक ठरत आहेत.

आजही शेतकऱ्यांनी बांधलेले पावसाचे पारंपरिक अंदाज आजही आश्वासक ठरत आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

शेती ही पावसावर अवलंबून आहे. निसर्गाचे चक्र केव्हा फिरेल याचा नेम नाही. कधी अधिक पाऊस होतो तर कधी दुष्काळ पडतो, त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय झाली आहे. भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. पेरणीपूर्व नियोजन करून शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत असतात. त्याचे आराखडे बांधतात यंदा पाऊस कसा होईल ? किती होईल ? याचे आराखडे तयार करतात. परंतु आजही शेतकऱ्यांनी बांधलेले पारंपरिक अंदाज आजही आश्वासक ठरत आहेत.

यंदाच्या पाऊसमानाबाबत हवामान खात्यासह या क्षेत्रातील तज्ज्ञांनीही पावसाचे अंदाज वर्तविले आहेत; पण पाऊसमानाच्या बाबतीत देशातील बळीराजाचेही काही पारंपरिक आडाखे असतात. पूर्णपणे नैसर्गिक आचरणावर आधारित असलेले हे अंदाज आजही ग्रामीण भागात अचूक आणि आश्वासक समजले जातात.

पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक पक्षी आपली घरटी बांधतात. पक्ष्यांनी आपली घरटी झाडाच्या टोकावर बांधली की पाऊस कमी, झाडाच्या मध्यावर बांधली की पाऊस मध्यम आणि पक्ष्यांनी घरटी झाडाच्या खालच्या भागात, झाडांच्या ढोलीत बांधली की पाऊसमान भरपूर होणार, असा एक पारंपरिक अंदाज वर्तविण्यात येतो. कोकिळा आणि पावश्या पक्षी घुमू लागले की लवकरच पाऊस येणार, असा अंदाज वर्तविला जातो, बगळ्याची पांढरी पिसे तपकिरी रंगाची दिसू लागली तर त्यावर्षी पाऊस भरपूर पडणार, असे अनुमान लावले जातात. हे नेहमीच खरे ठरतात.

पावसाची नक्षत्रे आणि त्यांची वाहने

पंचांगानुसार दरवर्षी पावसाच्या नक्षत्रानुसार त्याचे वाहन ठरते. त्या नक्षत्राचे त्यावर्षीचे वाहन काय आहे. यावरूनही पावसाचा अंदाज वर्तविण्यात येतो. नक्षत्राचे वाहन बेडूक, म्हैस किया हत्ती असेल तर भरपूर पाऊस, वाहन जर मोर, गाढव, उंदीर असेल तर मध्यम पाऊस आणि वाहन जर कोल्हा किवा मेंढा असेल तर कमी पाऊस, असे ठोकताळे बांधण्यात येतात. वाहन जर घोडा असेल तर केवळ पर्वतीय भागात पाऊस पडण्याचे संकेत समजले जातात. काही नक्षत्रांना तरणा, म्हातारा, सासू, सून अशी नावेही ग्रामीण भागात दिलेली आहेत. पुनर्वसू नक्षत्र म्हणजे तरणा पाऊस, पुष्य नक्षत्र म्हणजे म्हातारा पाऊस, मघा नक्षत्रातील पाऊस म्हणजे सासूचा पाऊस, तर पूर्वा नक्षत्रातील पाऊस म्हणजे सुनेचा पाऊस. असे ग्रामीण भागात बोलले जाते.

प्राणी आणि पाऊस

उन्हाळ्याच्या दिवसात जर गाढवे सतत कान पाडून बसू लागली, तर त्यावर्षी पाऊसमान चांगले असल्याचे समजण्यात येते. शेळ्या- मेंढ्या चरत असताना आपला नेहमीचा चारा सोडून तोंडाला येईल ती वनस्पती खात सुटली तर ते जादा पावसाचे लक्षण समजण्यात येते. साप आणि मुंग्या वारंवार बीळ आणि वारुळाबाहेर पडताना दिसणे हेही चांगल्या पावसाचे लक्षण मानण्यात येते. अश्या अनेक | समज आजही समाजात आहेत.


निसर्ग आणि पाऊस !

काही नैसर्गिक घटनांवरूनही त्या त्या वर्षीच्या पावसाचे अनुमान लावण्यात येते. हिमालयात नेहमीपेक्षा जादा प्रमाणात होणारी बर्फवृष्टी ही आगामी दुष्काळाची चाहूल देणारी समजली जाते. होळीच्या दिवशी जर वारा पश्चिम किवा उत्तर दिशेकडून वाहत असेल, तर त्यावर्षी भरपूर पाऊस होण्याचा होरा मांडला जातो. होळीच्या दिवशी पूर्व किंवा दक्षिण दिशेकडून वाहणारा वारा दुष्काळाची चाहूल समजण्यात येते. समुद्री हालचालीत होणाऱ्या बदलावरून किनारपट्टी भागातील लोक आणि प्रामुख्याने मच्छिमार मंडळी पावसाचा अचूक अंदाज बांधताना दिसुन येतात.


शेकडो वर्षापासून प्रचलित !

निसर्ग, प्राणी, पक्षी आणि वनस्पतींच्या दैनंदिन नैसर्गिक आचरणात होणाऱ्या बदलावरून पावसाचा अंदाज बांधण्याच्या या पद्धती ग्रामीण भागात शेकडो वर्षांपासून प्रचलित आहेत. विशेष म्हणजे, पावसाबाबतचे हे पारंपरिक अंदाज किंवा आडाखे सहसा चुकताना दिसत नाहीत. त्यामुळे आजही अनेक शेतकरी या निसर्गचक्रावर विसंबून राहूनच आपल्या शेतीकामांची आखणी करताना दिसतो. आजकाल विज्ञानामुळे पावसाबाबतचे अचूक अंदाज वर्तविणे सहज शक्य झालेले आहे; पण त्याच्याइतकेच है ग्रामीण भागातील पारंपरिक अंदाजही विश्वसनीय समजण्यात येतात.

वनस्पती आणि पाऊसमान !

ज्यावर्षी आंब्याचे पीक भरपूर येणार त्यावर्षी पाऊस ओढ देणार, हे वर्षानु- वर्षांचे अनुमान सांगण्यात येते. त्याचप्रमाणे ज्यावर्षी चिंचेच्या झाडावर जास्त चिंचा लागतील त्यावर्षी तुफान पाऊस बरसतो, असा ग्रामीण लोकांचा पूर्वानुमान आहे. ज्यावर्षी मोहाच्या झाडाला प्रमाणापेक्षा जादा पाने येतात त्यावर्षी मुसळधार पाऊस कोसळणार, असा आदिवासी लोकांचा विश्वसनीय अंदाज असतो. उत्तर भारतात बहावा वृक्ष जादा बहरला की पाऊसही बहरणार आणि बरसणार असे भाकीत मांडले जाते. ऐन उन्हाळ्यात जर बांबूची पाने हिरवीगार दिसत असतील तर ती धोक्याची घंटा समजण्यात येते आणि सहसा त्यावर्षी दुष्काळाचे सावट दाटून येते. ऐन उन्हाळ्यात डोंगरावरील गवत जर हिरवाई दाखवू लागले, तर ते तुफानी पावसाचे संकेत समजले जातात.

Web Title: Latest News Traditional rain forecasts made by farmers are still promising see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.