नाशिकसह जिल्ह्यातील बहुतांश भागात शनिवारी रात्री नऊ वाजेपासून गडगडाटी वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. हवामान खात्याने दोन दिवस नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. यानुसार शुक्रवार पाठोपाठ शनिवारीही पावसाने हजेरी लावली.वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक भागात नुकसान केले असून आज रविवारीसुद्धा वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
दरम्यान चक्रीय वाऱ्याची स्थिती अन् त्यामुळे दोन्ही समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यभरातील २९ जिल्ह्यांवर अवकाळी पावसाचे ढंग दाटून आले आहे. कुलाबा वेधशाळेकडून पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यासाठी वादळवाऱ्यासह विजांच्या इशारा देण्यात आला आहे. आज रविवारी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक शहरात साडे आठ वाजेपासून ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंत 7.2 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली तर निफाड संशोधन केंद्राने 2.8 मिलीमीटर पावसाची नोंद केली आहे.
मागील दोन दिवसांपासून उकाडा जाणवत असला तरीही सायंकाळी वाऱ्याचा वेग वाढून ढगांचा गडगडाट ऐकायला मिळतो आहे. तर शुक्रवारी जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. तर शनिवारी दिवसभर उन्हाचा चटका नागरिकांना जाणवला. दुपारी साडेचार वाजेनंतर उन्हाची तीव्रता कमी झाली होती; मात्र ढग दाटून आल्याने दमट वातावरण तयार झाले होते. यामुळे उकाड्यातही वाढ झाली होती. नागरिक घामाघूम होत होते. सात वाजेच्या सुमारास वारा नागरिकांना सुटल्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला, रात्री नऊ वाजता सोसाट्याचा वारा सुटला अन् पावसाला सुरुवात झाली. आजही पावसाचा इशारा
दरम्यान शुक्रवार आणि शनिवार रोजी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आज देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काल सायंकाळी नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर, सिन्नर आदी पट्ट्यात पावसाचे आगमन झाले. आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून सकाळी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आला. मात्र सायंकाळी जोरदार अवकाळी पावसाची शक्यता जाणवते.
Weather Update : अजुन किती दिवस आहे हा अवकाळी? वाचा संपूर्ण बातमी एका क्लीकवर