अहमदनगर : ३० जुलैपर्यंत भंडारदरा धरणाची (Bhandardara Dam) पाणीपातळी 743.19 मी व पाणीसाठा 9896 (89.64) दलघफु इतका झालेला आहे. सद्यस्थितीत धरण पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान बऱ्यापैकी असल्याने धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक बघता आज ३१ जुलै रोजी धरणाच्या सांडव्यामधुन 1000 क्युसेक ने विसर्ग प्रवरा नदीपात्रात (Pravara River) सोडण्यात आला आहे. त्यामध्ये आवश्यकतेनुसार टप्याटप्याने वाढ करण्यात येणार असल्याने प्रवरा नदीकाठच्या गावांना / वस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी दिवसभर मुसळधार पाऊस (Heavy rain) कोसळला. दिवसभराच्या बारा तासात धरणस्थळी ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणात सुमारे तीनशे दलघफू नवीन पाण्याची आवक होत उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेखा असलेले भंडारदरा ९० टक्के, तर निळवंडे धरण ५० टक्क्यांहून अधिक भरले. गेल्या चार दिवसांपासून या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी अधिक होते. मात्र, मंगळवारी सकाळपासून येथे पावसाचा जोर वाढत गेला. त्यामुळे आज सकाळपासून
दिवसभरात ६० मिमी. पाऊस
धरणस्थळी या हंगामात प्रथमच दिवसभरात ६० मिमी. पाऊस कोसळला. ओढे, नाल्यांना पुन्हा पूर आला आहे. त्यामुळे पावसाचे माहेरघर असलेल्या घाटघर, रतनवाडी येथे पुन्हा एकदा अतिवृष्टी होते की काय? अशी भीती या परिसरातील नागरिकांना वाटत आहे. आज मंगळवारी झालेल्या या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली.
दरम्यान २९३ दलघफू नवीन पाण्याची आवक होत साठा ९ हजार ८९६ दलघफू इतका झाला होता. भंडारदरा धरणातून वीज निर्मितीसाठी पाणी सोडण्यात येत असल्यामुळे तसेच निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही दिवसभर पावसाची संततधार सुरूच असल्याने या धरणात १०२ दलघफू नवीन पाण्याची आवक होत साठा ५० टक्क्यांहून अधिक म्हणजेच ४ हजार २३८ दलघफूपर्यंत पोहचला होता.