Lokmat Agro >हवामान > Water Discharged : तोतलाडोहचे 14, निम्न वेणाचे 21 तर नांदचे 7 गेट उघडले, वाचा सविस्तर 

Water Discharged : तोतलाडोहचे 14, निम्न वेणाचे 21 तर नांदचे 7 गेट उघडले, वाचा सविस्तर 

Latest News Water Discharged Totladoh Vena and Nand dam of nagpur district read in detail  | Water Discharged : तोतलाडोहचे 14, निम्न वेणाचे 21 तर नांदचे 7 गेट उघडले, वाचा सविस्तर 

Water Discharged : तोतलाडोहचे 14, निम्न वेणाचे 21 तर नांदचे 7 गेट उघडले, वाचा सविस्तर 

Nagpur Rain Update : पाऊस मुक्कामीच असून, अशीच स्थिती राहिल्यास सर्व धरणांचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे.

Nagpur Rain Update : पाऊस मुक्कामीच असून, अशीच स्थिती राहिल्यास सर्व धरणांचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नागपूर : पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या सततच्या पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील (Nagpur District) तोतलाडोह (ता. रामटेक), निम्न वेणा (ता. उमरेड) आणि नांद (ता. उमरेड) या तिन्ही जलाशयांतील जलस्तर धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे तोतलाडोहचे १४ गेट उघडण्यात आले असून, निम्न वेणा (वडगाव) चे २१ आणि नांदचे ७ गेट तर पेंचचे दोन गेट उघडले आहेत. या चार जलाशयांमधून सध्या एकूण १,८६७.७ क्युमेक पाण्याचा विसर्ग (water Dischargd) सुरू आहे. पाऊस मुक्कामीच असून, अशीच स्थिती राहिल्यास सर्व धरणांचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे.

पेंच नदीवरील मध्य प्रदेशातील चौराई धरणाचे गेट उघडल्याने याच नदीवरील तोतलाडोह (मेघदूत) जलाशय ८३ टक्के भरले आहे. या जलाशयाची पाणी साठवण क्षमता ४९० दलघमी असून, यात सध्या ४८७.७० दलघमी पाणी गोळा झाल्याने जलस्तर धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे आधी आठ आणि नंतर सहा असे एकूण १४ गेट ०.३ मीटरने उघडण्यात आले असून, त्यातून ४४३ क्युमेक पाण्याचा विसर्ग होत आहे. उमरेड तालुक्यातील निम्न वेणा (वडगाव) जलाशय ७९.५४ टक्के भरले असून त्यात सध्या १०७.२९२ दलघमी पाणीसाठा आहे. 

नांद जलाशयातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने निम्न वेणा जलाशयाच्या जलस्तरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे या जलाशयाचे १९ गेट प्रत्येकी ५० सेंमी तर दोन गेट २५ सेंमीने उघडले असून, या सर्व गेटमधून ८८४.३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नांद (ता. उमरेड) जलाशयात सध्या २९.७२ दलघमी पाणीसाठा असून, ते ५५.९० टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रातील सततचा पाऊस आणि वाढता जलस्तर विचारात घेता या जलाशयाचे ७ गेट प्रत्येकी ७५ सेंमीने उघडण्यात आले आहे. या सर्व गेटमधून ५४०.४० क्युमेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सावनेर तालुक्यातील खेकरानाला जलाशय भरल्याने त्याचेही दरवाजेही उघडण्यात आले आहेत. 

पेंच जलाशयाचे १६ दरवाजे उघडले
तोतलाडोहमधील पेंच जलाशयात येत असल्याने या • जलाशयाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. या जलाशयाची पाणीसाठा क्षमता १४९.३१ दलघमी असून, सध्या ते ९८.१२ टक्के भरले आहे. त्यामुळे पेंच जलाशयाचे दोन गेट रात्री ९.१५ वाजता ३० सेंमीने उघडण्यात आले होते. रात्री १० नंतर सहा गेट ३० सेंमीने तर रात्री १०.३० नंतर ८ गेट ३० सेंमीने उघडण्यात आले आहेत. या १६ गेटमधून ५०६.९४४ क्यूमेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याच्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या विसर्गामुळे पेंच नदीचा जलस्तर वाढला आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. खेकरानाला जलाशयातून ५०.१२ क्युमेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पाऊस व पाण्याची आवक सुरूच
२ पेंच, नांद व वेणा जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस कोसळत आहे. मध्य प्रदेशातील चौराई धरणाचे पाणी तोतलाडोह आणि नांद जलाशयाचे पाणी वेणा जलाशयात येते. मागील १२ तासांत नांदच्या पाणलोट क्षेत्रात ७६ मिमी तर वेणाच्या पाणलोट क्षेत्रात ७२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. पावसामुळे या तिन्ही जलाशयांत पाण्याची आवक सुरूच आहे.
 

Web Title: Latest News Water Discharged Totladoh Vena and Nand dam of nagpur district read in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.