Join us

नाशिक जिल्ह्यातील धरणांतील पाणी पातळी घटतेय, कोणत्या धरणांत किती पाणी?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 2:14 PM

त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांनाही पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.

नाशिक : फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यातच उन्हाच्या तीव्र झळा बसू लागल्या असून तापमानाचा पारा ३३ अंशाच्या वर चढू लागला आहे. जून महिन्यापर्यंत एल निनोचा प्रभाव राहणार असल्याने यंदा उन्हाचा कडाका जास्त राहणार असल्याचा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनाही पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये सद्यस्थितीत ४७ टक्के पाणीसाठा शिल्लक असून अपवाद वगळता सर्वच धरणांमधील पाणीसाठ्यात घट झालेली आहे. त्यामुळे सर्वांनाच 'सावध ऐका पुढल्या हाका' असा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. अमेरिकेतील 'नॅशनल ओशनिक अॅण्ड अॅटमोस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन' (नोआ) या संस्थेने ऑक्टोबर २०२३ मध्येच अंदाज वर्तवताना पावसाळ्यानंतर उन्हाळ्यात 'सुपर एल निनो'चा प्रभाव दिसणार असल्याचे म्हटले होते. मार्च ते मे २०२४ मध्ये 'सुपर एल निनो'चा प्रभाव दिसणार असून त्यामुळे सरासरी तापमान १.५ डिग्री सेल्सियस जास्त असणार आहे

गतवर्षी धरणांत ७१ टक्के

जिल्ह्यातील धरणांमध्ये सद्य:स्थितीत ४७ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर ६४ तर पालखेडमध्ये ३० टक्के, करंजवण-४ ४४ टक्के, पुणेगाव ५२ टक्के, तिसगाव टक्के, भोजापूर १७ टक्के, चणकापूर ४७ टक्के, पूनंद ८३ टक्के पाणीसाठा मध्याला ७१ टक्क्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर सरासरी तापमान २ डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असण्याची शक्यताही ३० टक्के असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. दरम्यान, गेल्या काही दिवसांत एल निनोचा प्रभाव कमी झाल्याने यंदा मान्सून चांगला जाणार असल्याचे हवामान खात्यातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु जूनपर्यंत एल निनोचा प्रभाव राहणार असल्याने उन्हाचा कडाका जाणवणार असल्याचेही सांगितले जात आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धरणांतील पाण्याचे नियोजन करणे व त्याचा काटकसरीने वापर होणे अपरिहार्य बनले आहे.

गिरणा धरणात ३८ टक्के साठा 

नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या गिरणा धरणात ३८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सन २०२२ पर्वत गिरणा धरण सलग चार वर्षे शंभर टक्के भरले होते. तर मागील वर्षी धरणात ५६.७३ टक्के पाणीसाठा होता. यंदा मात्र त्यात कमालीची घट झालेली आहे. गिरणा धरणावर एकूण ६९ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. त्यात जळगाव जिल्ह्यातील ५७ हजार हेक्टर क्षेत्राचा तर मालेगाव तालुक्यातील सुमारे १ हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश होतो. त्यामुळे गिरणा धरणावर अवलंबून शेतकऱ्यांची चिता वाढणार आहे.

गतवर्षी धरणांत ७१ टक्के पाणीसाठा

नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये सद्य:स्थितीत ४७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ६४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर पालखेडमध्ये ३० टक्के, करंजवण-४७ टक्के, वाघाड - ३० टक्के, ओझरखेड - ४४ टक्के, पुणेगाव - ५२ टक्के, तिसगाव- २८ टक्के, दारणा ४८ टक्के, भावली - ४० टक्के, भोजापूर १७ टक्के, चणकापूर - ५० टक्के, हरणबारी - ६० टक्के, केळझर - ४७ टक्के, पूनंद - ८३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी फेब्रुवारी मध्याला ७१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तुलनेत यंदा कमालीची घट झालेली आहे.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

टॅग्स :शेतीनाशिकहवामानपाणीकपात