Lokmat Agro >हवामान > पुढील तीन दिवस तापमान कसं राहील? वाचा हवामान अंदाज 

पुढील तीन दिवस तापमान कसं राहील? वाचा हवामान अंदाज 

Latest News weather forecast How will the temperature be for next three days | पुढील तीन दिवस तापमान कसं राहील? वाचा हवामान अंदाज 

पुढील तीन दिवस तापमान कसं राहील? वाचा हवामान अंदाज 

आगामी तीन दिवस काही ठिकाणी ढगाळ तर काही ठिकाणी किरकोळ पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

आगामी तीन दिवस काही ठिकाणी ढगाळ तर काही ठिकाणी किरकोळ पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका वाढत असून आगामी तीन दिवस काही ठिकाणी ढगाळ तर काही ठिकाणी किरकोळ पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच वेगात होणाऱ्या सध्याच्या वातावरणीय बदलातून रविवारपर्यत मुंबईसह कोकण व संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासहीत तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाचा अंदाज कायम टिकून राहण्याची शक्यता जाणवते. विदर्भ मराठवाड्यात हे वातावरण कदाचित फक्त आज व उद्यापर्यंतच टिकून राहू शकते, असा अंदाज जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. 

 जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रात सध्याचे पहाटेचे किमान तापमान हे 16 डिग्री से. ग्रेड व दुपारचे कमाल तापमान 30 डिग्री से. ग्रेड दरम्यान जाणवत आहे. पहाटेचे किमान तापमाने सध्या त्यांच्या सरासरी तापमानापेक्षा 4 डिग्री से. ग्रेडअधिक आहे, तर दुपारचे कमाल तापमान सरासरीच्या पातळीत आहे. ही दोन्हीही तापमाने रविवार 7 जानेवारीपर्यन्त ह्याच पातळीत राहण्याची शक्यता जाणवते. 

मुंबईसह कोकणात सध्याचे पहाटेचे किमान तापमान हे 20 डिग्री से. ग्रेड व दुपारचे कमाल तापमान 30-32 डिग्री से. ग्रेड  दरम्यान जाणवत आहे. तेथील ही दोन्हीही तापमाने सध्या त्यांच्या सरासरी तापमानापेक्षा 2 डिग्री से. ग्रेडने अधिक आहे, ही दोन्हीही तापमाने रविवार दि. 7 जानेवारीपर्यन्त ह्याच पातळीत राहण्याची शक्यता जाणवते. विना अडथळा उत्तरेकडून अधिक उंचीवरून मुंबईत येणारे थंड कोरडे वारे व निम्न पातळीतून दक्षिण भारतातूनही पूर्वदिशा झोताचे आर्द्रतायुक्त वारे, कि ज्यांचे सह्याद्रीमुळे दिशा बदलातून गुजराथच्या डांगी घळीतून सध्या मुंबईत प्रवेशित होत आहे. ह्या दोन वाऱ्यांच्या  संयोगातून महाराष्ट्राबरोबर मुंबईत ढगाळ वातावरण जाणवत आहे.
                      
मुंबईत वातावरण कसं असेल? 

परंतु ढगाळ वातावरणामुळे कमी सूर्यप्रकाश व समुद्रसपाटीमुळे मुंबईत सध्य:स्थितित असलेला हवेचा उच्चं दाब व त्यात मुंबईतील धुरयुक्त प्रदूषित शांत हवा ह्या तिघांच्या एकत्रित परिणामातून जमिनीलगतच धुरयुक्त धुक्याचे मळभ सध्या मुंबईत जाणवत आहे. आणि मुंबईत हे वातावरण कदाचित पुढील ३ दिवस म्हणजे रविवार 7 जानेवारीपर्यंत टिकून राहण्याची शक्यता जाणवते. 

Web Title: Latest News weather forecast How will the temperature be for next three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.