Lokmat Agro >हवामान > Maharashtra Rain Update : राज्यात 07 जुलै रोजी कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा? जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Rain Update : राज्यात 07 जुलै रोजी कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा? जाणून घ्या सविस्तर 

Latest News Weather Update Rain alert for these districts on July 07 in maharashtra Know in detail  | Maharashtra Rain Update : राज्यात 07 जुलै रोजी कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा? जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Rain Update : राज्यात 07 जुलै रोजी कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा? जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Rain Update : त्यानुसार राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे.

Maharashtra Rain Update : त्यानुसार राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Rain Update : जुलै च्या पहिल्या आठवड्यात राज्यातील काही भागात पावसाने (Rain) समाधानकारक हजेरी लावली तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळतो आहे. मुंबई वेधशाळेने आज आणि उद्याचा (06 आणि 07 जुलै) हवामान अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई वेधशाळेने वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार (weather Update) आज रोजी कोकणात बहुतेक ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात (Maharashtra Rain) अनेक ठिकाणी व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस किंवा मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उद्या 07 जुलै रोजी कोकणात बहुतेक ठिकाणी व मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तर आज रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात होती. तसेच रायगड ठाणे रत्नागिरी या जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर घाट भागातील तुरळ क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यात कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे. दुसरीकडे पुणे, नाशिक, सातारा या जिल्ह्यात तुरळ ठिकाणी मुसळधार त्यातील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आज सकाळपासूनच पावसाची रिपरीप सुरू असल्याचे चित्र आहे.

सात जुलै रोजीचा हवामान अंदाज 

तसेच उद्या 07 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच जळगाव, धुळे, सोलापूर या जिल्ह्यात विधानच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळीवाऱ्याचा इशारा, तर रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे

Web Title: Latest News Weather Update Rain alert for these districts on July 07 in maharashtra Know in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.