Join us

Weather Update : कुठे उष्णता, कुठे अवकाळी पावसाची शक्यता, संपूर्ण महाराष्ट्रासाठीचा हवामान अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 5:59 PM

कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात आजपासुन पुढील ५ दिवस अवकाळी पावसाचे वातावरण असणार आहे.

सध्या कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात आजपासुन पुढील ५ दिवस म्हणजे शनिवार दि.१८ मे पर्यंत अवकाळी पावसाचे वातावरण तर कोकणातील ७ जिल्ह्यात आजपासुन पुढील ३ दिवस म्हणजे गुरुवार दि.१६ मे पर्यंत ढगाळ वातावरणसहित किरकोळ पावसाची असणारी शक्यता आहे. मुंबई सह कोकणातील मुंबई शहर, उपनगर, ठाणे पालघर रायगड आजपासुन ३ दिवस म्हणजे गुरुवार दि.१६ मे पर्यंत उष्णतेची लाट तर नव्हे पण उष्णतेच्या लाटसदृश्य स्थिती व दमटयुक्त उष्णता या ५ जिल्ह्यात जाणवेल, अशी शक्यता जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.                      या उलट मराठवाडा व विदर्भातील १९ जिल्ह्यात व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, दिंडोरी, नांदगाव, येवला व लगतच्या तालुक्यात मात्र अवकाळी सावट असणार आहे. मात्र पहाटेचे किमान व दुपारचे कमाल अशी दोन्हीही तापमाने आजपासुन ३ दिवस म्हणजे गुरुवार दि.१६ मे पर्यंत सरासरीपेक्षा २ ते ३ डिग्री से. ग्रेडने खालावून उष्णतेच्या काहिली विशेष जाणवणार नाही, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.                          तसेच कोकण व मध्य महाराष्ट्रातील उर्वरित ११ जिल्ह्यात मात्र दोन्हीही तापमाने सरासरी इतकीच असतील. मान्सून शनिवार दि.१९ मे दरम्यान बंगालच्या उपसागरात, इंडो्नेशियाच्या पश्चिम किनारपट्टी व सुमात्रा बेटापर्यन्त पोहोचण्याची शक्यता कायम जाणवते. त्यानुसार देशाची पूर्व किनारपट्टी, कन्याकुमारी, व आग्नेय अरबी समुद्रात पूर्वमोसमी गडगडाटी पाऊसपूरक वातावरण तयार होत आहे, असे जाणवते.    लेखक : जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ, माणिकराव खुळे 

नाशिक जिल्ह्यासाठी काय? 

इगतपुरी येथील विभागीय संशोधन केंद्राच्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यात दि.१५ ते १७ मे दरम्यान हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. आकाश पुढील पाच दिवस अंशतः ढगाळ ते ढगाळ राहील. तर प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई यांच्या अंदाजनुसार नाशिक जिल्ह्यातील काही ठिकाणी दि. १४ व १५ मे २०२४ रोजी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट व सोसाट्याचा वारा (५०-६० किमी प्रतितास वेग) व गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. तसेच दि. १६ मे २०२४ रोजी हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :हवामाननाशिकमहाराष्ट्रपाऊसगारपीट