पुणे : पुण्यात आज अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारनंतर पडलेल्या पावसामुळे पुण्यातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागले आहे. या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
दरम्यान, आज सकाळपासूनच पुण्यात ढगाळ वातावरण होते. उकडाही जाणवत असल्यामुळे आज दुपारनंतर म्हणजे ३ वाजण्याच्या सुमारास पुण्यात पावसाला सुरुवात झाली. अचानक जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून अनेक नागरिक आडोशाचा सहारा घेत आहेत.
कालही पुण्यातील कात्रज, स्वारगेट, हडपसर, कॅम्प, सिंहगड रोड, धायरी या परिसरामध्ये काही प्रमाणावर पाऊस पडला होता. पण आजचा पाऊस कालच्या तुलनेत जास्त असल्यामुळे नागरिकांना अडकून पडावे लागले आहे.
उन्हाळी पिकांचे नुकसानसध्या कडक उन्हाळा सुरू असून मान्सून एका महिन्यावर येऊन ठेपलेला आहे. हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा 106% पाऊस पडणार असल्याचा अंदाज जाहीर केला आहे. यामुळे शेतकरी सुखावला असला तरी क** उन्हाळ्यामध्ये अवकाळी पाऊस थांबण्याचे नाव घेईना म्हणून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होताना दिसत आहे. मागच्या एक ते दीड महिन्यांपासून महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस पडत असून यामध्ये शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचे नुकसान होत आहे.