Rain Update : एखाद्या गाव, शहरात काही विशिष्ट भागात पाऊस (rain) पडतो. कुठे ओले तर कुठे सुके असते. असे का होते. याची काय करणे असतील. तर एखाद्या गाव, शहरात काही विशिष्ट भागात पडणारा पाऊस म्हणजे, वातावरणातील संवहनी क्रियेद्वारे पडणारा पाऊस (Rain Update) होय. येथे तेथील भौगोलिक रचना महत्वाची असते. येथे त्या भागावर पडणारी सूर्याची उष्णता हाच महत्वाचा फॅक्टर असतो, अशी माहिती जेष्ठ निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. सूर्याच्या उष्णताऊर्जेने जमिनीचा पृष्ठभाग तापून जेंव्हा जमिनीने शोषलेले पाण्याचे बाष्पभवनातून (Monsoon Update), ऊबदार, अशा दमट पाण्याच्या वाफेचे अवकाशात उरध्वगमन होवून, उंचावरील थंडाव्यातून, पाण्याच्या वाफेचे सांद्रीभवन होवून फक्त त्या मर्यादित क्षेत्रातच पडणारा पाऊस म्हणजे वातावरणातील संवहनी क्रियेद्वारे पडणारा पाऊस होय. म्हणून तर हा पाऊस एखाद्या गाव, शहरात काही विशिष्ट भागात पाऊस पडतो. कुठे ओले तर कुठे सुके असते. समुद्रावरून अतिउंचावर संक्रमणित झालेले बाष्प त्यात मिसळले जाते व त्याचाही आलेल्या बाष्पाशी संयोग होतो. म्हणून तर या पावसाला स्थानिक वातावरणीय ऊर्जेबरोबर समुद्रीय ऊर्जेचा अप्रत्यक्ष संबंध असतो. साधारण पूर्वमोसमी हंगामातील मार्च ते मे तसेच परतीच्या पाऊस फिरू लागल्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर (उत्तरा, हस्त, चित्रा नक्षत्र ) महिने, मान्सून आगमन व खंडा नंतरच्या काही दिवसातील पाऊस हा अश्या पद्धतीचा पाऊस असतो. या प्रक्रियेतून झालेल्या पावसाचे उदाहरण द्यावयाचे झाले तर, मागील वर्षी म्हणजे ६ महिन्यापूर्वी १७ डिसेंबर २०२३ रोजी सागरीय किनारपट्टीवरील वातावरणीय परिणामातून एकाकी उरध्वदिशेने झालेल्या उष्णसंवहनी प्रक्रियेतुन तामिळनाडूतील 'थुथूकुडी ' येथे २४ तासात झालेला ९५ सेमी. पाऊस हे त्याचे उदाहरण होय.
माणिकराव खुळे Meteorologist (Retd )IMD Pune.