पूर परिस्थितीशी संबंधित माहिती आणि सात दिवसांपर्यंतचे अंदाज रिअल-टाइम म्हणजेच त्याचवेळी जनतेला देण्यासाठी, केंद्रीय जल आयोगाचे (CWC) अध्यक्ष कुशविंदर वोहरा यांनी आज "फ्लडवॉच" हे मोबाईल अॅप्लिकेशन लॉन्च केले.
आयोगाच्या अंतर्गत, विकसित करण्यात आलेल्या वापरकर्त्यासाठी अनुकूल अशा अॅपमध्ये लेखी आणि ऑडिओ माहिती असेल, आणि ही सर्व माहिती दोन भाषांमध्ये उपलब्ध आहे, जसे की, इंग्रजी आणि हिंदी. अॅपमध्ये रिअल-टाइम फ्लड मॉनिटरिंग व्यवस्था असून, त्यामुळे देशभरातील पूरस्थितीवर सतत देखरेख ठेवता येईल. तसेच, या अॅपचा उपयोग, विविध स्त्रोतांमधून रियल टाईम जल डेटा देखील बघता येईल. तसेच, वापरकर्त्यांना त्यांच्या आजूबाजूच्या प्रदेशातील, पूर परिस्थितीची आणि त्याविषयीच्या मार्गदर्शनाची माहिती देखील मिळेल.
इतर प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये इंटरएक्टिव्ह नकाशा वापरून अंदाज व्यक्त केला जाणार आहे. या संवादात्मक नकाशावरून वापरकर्ते थेट आपले स्थानक निवडून आयोग पूर अंदाज (२४ तासांपर्यंत) किंवा सात दिवसांची पूर विषयक स्थिती तपासू शकतील.
वापरकर्त्याने ड्रॉपडाऊनमधून आपले स्थानक निवडल्यानंतर, नकाशावर ते स्थान झूम केले जाईल. अॅपवर, राज्यवार/खोऱ्यानिहाय पूराचा २४ तासांपर्यन्तचा अंदाज किंवा पूर स्थिती सांगितली जाईल. ड्रॉपडाउन मेनूमधून विशिष्ट स्थानके निवडून, राज्यानुसार किंवा नदी खोऱ्यानुसार माहिती मिळवली जाऊ शकेल. वापरकर्ता-अनुकूल अॅप अॅन्ड्रॉइड मोबाईलवर उपलब्ध आहे, हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून मोफत डाऊनलोड करता येईल. हे अॅप लवकरच अॅपल आयओएस वर देखील उपलब्ध होईल.