Lokmat Agro >हवामान > Lightning Care विजांचा कडकडाट; शेतकऱ्यांनो कशी बाळगाल सावधानता

Lightning Care विजांचा कडकडाट; शेतकऱ्यांनो कशी बाळगाल सावधानता

Lightning Care; Lightning; How should farmers be careful? | Lightning Care विजांचा कडकडाट; शेतकऱ्यांनो कशी बाळगाल सावधानता

Lightning Care विजांचा कडकडाट; शेतकऱ्यांनो कशी बाळगाल सावधानता

शेतकरी बांधवांनी मेघ गर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने काय काळजी घ्यावी.

शेतकरी बांधवांनी मेघ गर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने काय काळजी घ्यावी.

शेअर :

Join us
Join usNext

पावसाळ्याची सुरुवात ही नेहमीच वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह असते. वीज पडू नये असे आपल्याला म्हणताच येणार नाही. अशा परिस्थितीत आपल्या हातात फक्त एकच गोष्ट असते, ती प्रक्रिया समजून घेणे आणि काही गोष्टींची काळजी घेणे. कारण भीती आणि अज्ञान या दोन गोष्टी कोणत्याही आपत्तीपासून होणारे नुकसान ठरवतात.

कशी घ्याल खबरदारी?
शेतकरी बांधवांनी मेघ गर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी.
• मेघ गर्जना, विजांचा कडकडाट व जोरदार वाऱ्याची शक्यता असल्याने नवीन लागवड केलेल्या फळबागांना तसेच भाजीपाला पिकांना जोरदार वाऱ्यामुळे झाडे पडू नये म्हणून काठी/बांबू च्या सहय्याने आधार द्यावा.
• शेतामध्ये काम करत असल्यास त्वरित सुरक्षित ठिकाणी जावे. झाडाखाली थांबणे टाळावे.
• जनावरे तलाव, नदी किंवा इतर पाण्याच्या ठिकाणी असतील तर त्यांना त्वरित बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी आणावे.
• जनावरे ट्रॅक्टर किंवा इतर धातूंच्या वस्तूंपासून लांब बांधावीत.
• वाहने झाडाखाली उभी करू नयेत.
• काढणी केलेला शेतीमाल प्लास्टिकच्या कागदाने झाकावा.
• विद्युत उपकरणे, विद्युत तारा यांचा संपर्क टाळावा.
• जनावरांना झाडाखाली जमा होऊ देऊ नये.

शेतकरी बांधवांनी हवामान आधारित शेतीविषयक सल्ला आपल्या अँड्रॉइड मोबईलवर मिळविण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वरून 'मेघदूत' अँड्रॉइड अॅप्लिकेशन तर मेघगर्जना व विजांचा कडकडाट इ. च्या अंदाजासाठी 'दामिनी' अँड्रॉइड अॅप्लिकेशन डाउनलोड करावे व त्याचा वापर करावा.

- मेघदूत अॅप डाउनलोड करण्यासाठी लिंक: https://play.google.com/store/apps/details?id=com.aas.meghdoot
- दामिनी अॅप डाउनलोड करण्यासाठी लिंक: https://play.google.com/store/apps/details?id=com.lightening.live.damini

अधिक वाचा: शेतकऱ्यांनो विंचू चावला कसे ओळखाल? कसा टाळाल विंचूदंश

Web Title: Lightning Care; Lightning; How should farmers be careful?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.