Maharashtra Rain Updates : राज्यात सध्या धोधो पावसाने हजेरी लावली असून पश्चिम घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून उद्याही पश्चिम घाटमाथा आणि इतर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाठीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून राज्यातील प्रमुख धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा या जिल्ह्यांमधील महत्त्वाच्या धरणांतून नदीपात्रात आणि पुढील धरणांकडे पाणी सोडण्यात येत असून धरणांच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पानशेत, वरसगाव, भाटघर, निरा देवघर, वीर, पवना, मुळशी, तासकमान आणि नाशिक, सोलापूर, नगर जिल्ह्यांतील धरणाचा यामध्ये सामावेश आहे. मागील तीन ते चार दिवसांत झालेल्या पावसामुळे राज्यातील एकूण पाणीसाठ्यात वाढ झाली असून मराठवाड्यातील जायकवाडीची पाणीपातळीही आता वाढू लागली आहे.
(Maharashtra Dam Water Latest Updates)
धरणे आणि धरणातून सोडलेला पाण्याचा विसर्ग (क्युसेकमध्ये) - ४ जुलै सायंकाळी ७ वाजताची आकडेवारी
१) भंडारदरा----२५,३९४ २) निळवंडे ---३०,७७५ ३) आढळा----४,०७० ४) भोजापुर----०००० ५) ओझर-----१६,२८८ ६) कोतुळ---३०,१२५ ७) नांदूर मधमेश्वर---४४,७६८ ८) गंगापूर---६,००० ९) दारणा---२२,९६६ १०) पानशेत---१२,५३२ ११) खडकवासला--४५,७०५ १२) मुळशी---- ३०,२१८ १३) चासकमान----३०,१६५ १४) डिंभे---१८,००० १५) वीर----६३,१७३ १६) भाटघर ---२६,१३१ १७) भातसा--१७,७१६ १८) सूर्या---४१,०९७ १९) गडनदी---३०,३७२ २०) जगबुडी नदी---७,९७५ २१) दौंड (पुणे)---९८,६७५ २२) उजनी------२१,६०० २३) दूधगंगा------९,३५० २४) राधानगरी----४,३५६ २५) धोम-------६,१९७ २६) कोयना----५२,१०० २७) हतनूर ------४८,४१७ २८) गोसीखुर्द---१,३१,५८०