राज्यात मान्सून दाखल झाला असून रखरखलेल्या कोरड्या धरणांमधील जलसाठा वाढताना दिसत आहे. मान्सूनच्या सुरूवातीला राज्यातील धरणांमध्ये २०.२३ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
जलसंपदा विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व लघू, मध्यम व मोठ्या धरण प्रकल्पांमध्ये आजल ८१९२ दलघमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
मराठवाड्यात ९२० धरणांमध्ये मागील काही दिवसात झालेल्या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात काही अंशी वाढ झाली आहे. मराठवाड्यात आता ९.२२ टक्के जलसाठा उरला आहे.
पुण्यातील धरणांमध्ये आता १३.२० टक्के पाणीसाठा शिल्लक झाला असून मागील आठवड्यात तो १८ टक्क्यांवर होता. नाशिक विभगातील एकूण ५३७ धरणांमध्ये २२.७४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
कोणत्या विभागात किती पाणी शिल्लक?