Lokmat Agro >हवामान > Maharashtra Dam Water Storage: राज्यातील धरणात आजपर्यंत केवळ २२.८५% उपयुक्त पाणीसाठा

Maharashtra Dam Water Storage: राज्यातील धरणात आजपर्यंत केवळ २२.८५% उपयुक्त पाणीसाठा

Maharashtra Dam Water Storage: Only 22.85% usable water storage in dams in the state till date | Maharashtra Dam Water Storage: राज्यातील धरणात आजपर्यंत केवळ २२.८५% उपयुक्त पाणीसाठा

Maharashtra Dam Water Storage: राज्यातील धरणात आजपर्यंत केवळ २२.८५% उपयुक्त पाणीसाठा

Maharashtra Dam Water Storage: राज्यातील धरणांतील आजपर्यंतचा उपयुक्त पाणीसाठा केवळ २२.८५% इतका असून सर्वात कमी मराठवाड्यातील धरणांमध्ये आहे.

Maharashtra Dam Water Storage: राज्यातील धरणांतील आजपर्यंतचा उपयुक्त पाणीसाठा केवळ २२.८५% इतका असून सर्वात कमी मराठवाड्यातील धरणांमध्ये आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सन 2024 च्या पावसाळ्यातील 4 जुलै 2024 रोजी चा राज्याच्या प्रमुख धरणांमधील (Maharashtra Dam Water Storage) एकूण प्रकल्पीय पाणीसाठा हा सुमारे 326.91 टीएमसी म्हणजेच 22.85% आहे. राज्याच्या सहा महसूल विभाग निहाय प्रकल्पिय साठा पुढीलप्रमाणे आहे.

राज्यातील प्रमुख धरणांचा (साठवण क्षमतेनुसार)एकूण प्रकल्पीय पाणीसाठा हा सुमारे 1430.63 टीएमसी इतका आहे.

 1) नागपूर विभागाचा प्रकल्पीय पाणीसाठा हा अंदाजे 162.70 टीएमसी इतका आहे असुन आज रोजी  तोअंदाजे 59.10 टीएमसी म्हणजेच 36.33%इतका आहे.                                                     

 2) अमरावती विभागातील धरणांचा एकूण प्रकल्पीय पाणीसाठा हा 136.75 टीएमसी इतका असून आजचा प्रकल्पीय पाणीसाठा हा अंदाजे 51.76 टीएमसी म्हणजे 38.76% इतका आहे.

3) मराठवाडा विभागातील  धरणांचा एकूण प्रकल्पीय पाणीसाठा हा सुमारे 256.45 टीएमसी इतका असून आजचा प्रकल्पीय पाणीसाठा सुमारे 24.87 टीएमसी म्हणजेच 9.70% टक्के इतका आहे.

4) नाशिक विभागातील धरणांचा एकूण प्रकल्पीय पाणीसाठा हा 209.61 टीएमसी इतका असून आजचा प्रकल्पीय पाणीसाठा सुमारे 46.83 टीएमसी म्हणजेच 22.33% इतका आहे.

5) पुणे विभागातील धरणांचा एकूण प्रकल्पीय पाणीसाठा हा 537.28 टीएमसी इतका असून आजचा प्रकल्पीय पाणीसाठा सुमारे 97.36 टीएमसी म्हणजेच 18.12% इतका आहे.

 6) कोकण विभागातील धरणांचा एकूण प्रकल्पीय पाणीसाठा हा 130.84 टीएमसी इतका असून आज चा प्रकल्पीय पाणीसाठा अंदाजे 46.95 टीएमसी इतका म्हणजेच 35.88% इतका आहे.

महत्वाचे म्हणजे  अमरावती व नागपूर विभागामध्ये सर्वात जास्त प्रकल्पीय पाणीसाठा अनुक्रमे 38.76% व 36.33% इतका असून मराठावाडा विभागात सर्वात कमी प्रकल्पीय पाणीसाठा म्हणजे 9.70 टक्के इतकाच आहे . त्यामुळे  मोठ्या पावसाची आवश्यकता  व प्रतीक्षा आहे.                                              

महत्त्वाचे म्हणजे कोकणघाट माथ्यावरील पश्चिमेकडे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी प्राधान्याने गोदावरी खोरे (115TMC), कृष्णा खोरे व तापी खोऱ्यामध्ये वळविणे अत्यंत गरजेचे असून त्या दृष्टीने राज्य व केंद्र सरकारने तातडीने पाणी वळविण्याचा कार्यक्रम अथवा  नदी जोड प्रकल्प हाती घेऊन पावसाचे प्रमाण अतिशय कमी असलेल्या विभागांत  व  पाणी तुटीचे खोऱ्यांमध्ये पाणी वळविणे हे भविष्यात शेतीचे सिंचनासाठी व पिण्याचे पाणी  उपलब्ध होण्याच्या दृष्टीने उपयुक्त व अनिवार्य आले.

-हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग

Web Title: Maharashtra Dam Water Storage: Only 22.85% usable water storage in dams in the state till date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.