पुणे : राज्यामध्ये जून ते सप्टेंबर २०२४ दरम्यान सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, नाशिक, चंद्रपूर या भागांत १०० टक्के आणि उर्वरित भागांत साधारणपणे ९५ ते ९८ टक्के पावसाचा अंदाज आहे.
पुण्यात शंभर टक्के पावसाचे प्रमाण असेल, असा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला. जून-जुलै महिन्यात पावसाचा खंड चांगला पाऊस होईल, असेही पडेल आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये त्यांनी सांगितले.
ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चांगला सध्या कमी दिवसांत अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठे खंड पडतील, असे हवामान राहणार आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक राहील. जून-जुलै महिन्यात पाऊस ओढ देणार आहे.
या भागात पडणार खंड
वाऱ्याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी व तापमान कमी आढळल्याने जून, जुलै महिन्यात धुळे, राहुरी, अकोला, पाडेगाव, शिंदेवाही, पुणे, कोल्हापूर येथे पावसात मोठा खंड राहण्याची शक्यता असून, दापोली, नागपूर, निफाड, सोलापूर, जळगाव व परभणी येथे खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे.
कसा मांडला जातो अंदाज?
राज्यामध्ये सरासरीच्या ९९ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. हा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारित आहे. गेल्या ३० वर्षांची आकडेवारी या अंदाजासाठी वापरण्यात आली आहे.
मान्सून पुढे कसा सरकतो?
दक्षिण-पश्चिम मोसमी वारे उबदार पाण्यावरून प्रवास करतात. त्या वाऱ्यांमध्ये ओलावा असतो. या वाऱ्यांच्या प्रवेशामुळे हवामानात वेगाने बदल होतो. हे वारे जून महिन्यात दक्षिणेकडून भारतात प्रवेश करतात आणि उत्तरेकडे सरकतात व एका महिन्यात संपूर्ण देश व्यापतात.
दोन-तीन दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात
● दोन दिवसांपासून केरळमध्ये मान्सूनचा मुक्काम होता, तो आता पुढे सरकला आहे. रविवारी पारी मान्सूनने तामिळनाडू, कर्नाटकचा काही भाग, आंध्रप्रदेशचा काही भाग आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये शिरकाव केला आहे.
● येत्या दोन-तीन दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. तसेच राज्यातील विदर्भामधील तापमान किंचित कमी झाले असून, अनेक भागांत पावसाचा अंदाज दिला आहे.
● यंदा वेळेआधीच मान्सून दाखल झाला. केरळमध्ये दोन दिवसांपूर्वी दाखल झालेला मान्सून पुढे र सरकला नव्हता. रविवारी मान्सूनने मोठी वाटचाल केली आहे. बराच भाग त्याने व्यापला असून, त्याचा पुढील प्रवासही वेगाने होईल.
तुमच्या भागात कसा पाऊस? (जून ते सप्टेंबर-मिमीमध्ये)
विभाग | सरासरी | अंदाज | टक्के |
अकोला | ६८३ | ६७१ | ९८ |
नागपूर | ९५८ | ९३३ | ९७ |
यवतमाळ | ८८२ | ८८२ | १०० |
सिंदेवाही (चंद्रपूर) | ११९१ | १२२६ | १०३ |
परभणी | ८१५ | ७८८ | ९७ |
दापोली | ३३३९ | ३५४० | १०६ |
निफाड | ४३२ | ४४६ | १०३ |
धुळे | ४८१ | ४५६ | ९५ |
जळगाव | ६४० | ६०८ | ९५ |
कोल्हापूर | ७०६ | ६७४ | ९५ |
कराड | ६५० | ६३० | ९७ |
पाडेगाव | ३६० | ३३२ | ९५ |
सोलापूर | ५४३ | ५०० | ९५ |
राहुरी | ४०६ | ४०३ | ९९ |
पुणे | ५६६ | ५६६ | १०० |
शेतकऱ्यांनी चांगला पाऊस झाल्यावर पेरणी करावी. कोकणात अधिक पाऊस असल्याने भाताचे उत्पादन चांगले होईल, पण मराठवाड्यात कमी पाऊस असल्याने कमी पाण्यात होणारी पिके लावावीत. कमी पाण्यातही चांगले उत्पन्न देतील, अशा पिकांचे वाण तयार करणे आवश्यक आहे. - डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामानशास्त्रज्ञ