Lokmat Agro >हवामान > Maharashtra Rain : पुढील चार दिवसांत 'इथे' पडणार पाऊस! जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Rain : पुढील चार दिवसांत 'इथे' पडणार पाऊस! जाणून घ्या सविस्तर

Maharashtra monsoonRain update next four days imd report farmer sowing cultivation crop insurance heavy rain | Maharashtra Rain : पुढील चार दिवसांत 'इथे' पडणार पाऊस! जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Rain : पुढील चार दिवसांत 'इथे' पडणार पाऊस! जाणून घ्या सविस्तर

२२ जून ते २५ जून दरम्यान राज्यात हवामान कसे राहील आणि कुठे पाऊस पडेल यासंदर्भातील अंदाज हवामान विभागाने वर्तवले आहेत. 

२२ जून ते २५ जून दरम्यान राज्यात हवामान कसे राहील आणि कुठे पाऊस पडेल यासंदर्भातील अंदाज हवामान विभागाने वर्तवले आहेत. 

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : मान्सूनच्या पावसाने राज्य व्यापून टाकलं असून केवळ नंदुरबार जिल्ह्यामध्ये अजून मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली नाही. येणाऱ्या तीन ते चार दिवसांमध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्येसुद्धा मान्सूनचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, येणाऱ्या चार दिवसांत म्हणजेच २२ जून ते २५ जून दरम्यान राज्यात हवामान कसे राहील आणि कुठे पाऊस पडेल यासंदर्भातील अंदाज हवामान विभागाने वर्तवले आहेत. 

दरम्यान, पुढील चारही दिवस राज्यातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. २२ जून आणि २३ जून रोजी कोकण आणि विदर्भामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर २४ आणि २५ जून रोजी विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर २२ ते २५ जून दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कुठे पडणार पाऊस?
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील चारही दिवस म्हणजे २२ ते २५ जून दरम्यान ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर २५ जून रोजी सातारा जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. २२ जून रोजी कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर या भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

२३ जून रोजी कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. २४ आणि २५ जून रोजी कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची चिन्हे आहेत. 

Web Title: Maharashtra monsoonRain update next four days imd report farmer sowing cultivation crop insurance heavy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.