Maharashtra Rain alert today:राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसासह गारपीटीचा इशारा देण्यात आहे. आज विदर्भातील ५ जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला असून एकूण ९ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
२५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत वादळी पावसासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ मराठवाडा वगळता उर्वरित राज्यात बहुतांशी ढगाळ वातावरण राहणार आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. पावसाच्या शक्यतेमुळे विदर्भ व मराठवाड्यात गराठा वाढला असून तापमानाचा पारा घसरला आहे.
मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी आज ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे. गारपीट व जोरदार पावसाची तीव्रता विदर्भात अधिक राहणार असल्याचे हवामान विभागाने वर्तवले. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस व गारपीटीची शक्यता विदर्भात आहे. वीजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Maharashtra Rain Alert: विदर्भ- मराठवाड्यात १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट, पुढील ३ दिवस ....
ऑरेंज अलर्ट कोणत्या जिल्ह्यांना?
अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
यलो अलर्ट कोणत्या जिल्ह्यांना?
मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला असून विदर्भात अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.