Join us

Maharashtra Rain : मान्सून परतला तरीही राज्यात ठिकठिकाणी पडतोय पाऊस! काय आहेत हवामानाचे इशारे?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 9:23 PM

Maharashtra Rain : नैऋत्य मान्सून संपला असला तरी ईशान्य मान्सूनच्या पावसाला तामिळनाडू आणि परिसरामध्ये सुरूवात झालेली आहे. पण राज्यात पुढील चार दिवस पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Maharashtra Rain Updates : राज्यात आता नैऋत्य मान्सूनच्या पावसाने आपली रजा घेतली आहे. परतीचा पाऊसही संपला आहे, पण राज्यात अजून मोठ्या प्रमाणावर पाऊस पडताना दिसत आहे. कारण नैऋत्य मान्सून संपला असला तरी ईशान्य मान्सूनच्या पावसाला तामिळनाडू आणि परिसरामध्ये सुरूवात झालेली आहे. पण राज्यात पुढील चार दिवस पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दरम्यान, मान्सून परतला तरी राज्यात पडणारा पाऊस हा बंगालच्या उपसागरामध्ये तयार होणाऱ्या वाऱ्यामुळे आणि उष्णतेमुळे पडत असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर येणाऱ्या चार दिवसांत राज्यातील काही जिल्हे वगळता सर्वच जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, १८ ऑक्टोबर रोजी पालघर, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, बुलढाणा, अकोला, नागपूर आणि भंडारा हे जिल्हे वगळता सर्वच जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर १९ ऑक्टोबर आणि २० ऑक्टोबर रोजी विदर्भातील काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. 

तर २१ ऑक्टोबर रोजी पावसाचा जोर काहीसा कमी होणार असून केवळ मध्य महाराष्ट्राच्या मध्य बिंदूच्या आसपासच्या जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. 

Maharashtra Rain : मान्सून परतला तरीही राज्यात 'का' पडतोय जोरदार पाऊस? हवामान विभाग म्हणतंय...

टॅग्स :मोसमी पाऊसपाऊसशेतकरीपीक