Join us

Maharashtra Rain : मान्सून परतला तरीही राज्यात 'का' पडतोय जोरदार पाऊस? हवामान विभाग म्हणतंय...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 9:31 PM

मागील काही दिवसांपासून परतीचा पाऊस नंदुरबार जिल्ह्यात स्थिरावला होता पण ईशान्येकडील मान्सून तामिळनाडू आणि आजूबाजूच्या परिसरात सक्रिय झाल्यामुळे राज्यातून नैऋत्य मान्सून परतल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागाने केली आहे.

Maharashtra Rain : राज्यातील मान्सूनच्या पावसाचा हंगाम आता पूर्णपणे संपला आहे. काल हवामान विभागाने राज्यातून मान्सून परतल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले . पण मान्सूनचा पाऊस पूर्णपणे परतला असला तरीही राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडताना दिसत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. मका, सोयाबीन, कापूस या पिकांना मोठा फटका बसत आहे. 

मागील काही दिवसांपासून परतीचा पाऊस नंदुरबार जिल्ह्यात स्थिरावला होता पण ईशान्येकडील मान्सून तामिळनाडू आणि आजूबाजूच्या परिसरात सक्रिय झाल्यामुळे राज्यातून नैऋत्य मान्सून परतल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागाने केली. पण राज्यात सध्या पडत असलेल्या पावसामुळे राज्यातील शेतकरी हैराण झाले आहेत.

'का' पडतोय पाऊस?बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यामुळे आणि दुपारपर्यंत वाढत असलेल्या उष्णतेमुळे आकाशामध्ये मोठमोठ्या ढगांची निर्मिती होऊन वादळी पाऊस पडत आहे. तर पुढील काही दिवस राज्यात ही स्थिती राहणार आहे. साधारण डिसेंबर महिन्यापर्यंत हा पाऊस राज्यात पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. वाऱ्यामुळे आणि उष्णतेमुळे पडत असलेल्या पावसामुळे विजांचा कडकडाट होत आहे.

नैऋत्य मान्सून संपूर्ण भारतातून परतला आहे. तर ईशान्य मान्सून तामिळनाडू भागात सक्रीय झालाय. पण बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे आणि दुपारपर्यंत वाढत असलेल्या उष्णतेमुळे मोठमोठ्या ढगांची निर्मिती होऊन राज्यात सध्या वादळी पाऊस पडतो आहे. ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत अशाच प्रकारच्या पावसाची शक्यता आहे.- डॉ. एस. डी. सानप (शास्त्रज्ञ-डी, IMD पुणे)

टॅग्स :हवामानपाऊसमोसमी पाऊसपीकशेतकरी