Join us

Maharashtra Rain : मुसळधार, अतिजोरदार ते हलक्या सरी! राज्यात आज कुठे पडणार पाऊस?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 2:18 PM

Maharashtra Latest Rain Updates : राज्यभर मान्सूनचा पाऊस बरसत असून जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने राज्यभरातील विविध ठिकाणी जोरदारपणे हजेरी लावली आहे.

Maharashtra Weather Updates : राज्यभर मान्सूनचा पाऊस बरसत असून जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने राज्यभरातील विविध ठिकाणी जोरदारपणे हजेरी लावली आहे. तर आज (१३ जुलै) रोजी राज्यभरातील विविध ठिकाणी पावसाचे प्रमाण कसे असेल यासंदर्भात हवामान विभागाने दिलेली माहिती...

राज्यातील पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर यवतमाळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील सांगली, सोलापूर, लातूर, धारशिव, नगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर नगर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जळगाव आणि मराठवाड्यातील चार जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

टॅग्स :हवामानशेतकरीपाऊसमोसमी पाऊस