वायव्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, आज विदर्भासह मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आज राज्यात दक्षिण व उत्तर कोकणात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून मराठवाड्यात व विदर्भातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उद्यापासून राज्यभरात पावसाचा जोर वाढणार असून चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांना उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. पुढील दोन दिवसात हे क्षेत्र ओरिसा आणि छत्तीसगडकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे 14 ते 17 सप्टेंबरपर्यंत राज्यात बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 17 तारखेपर्यंत राज्यात पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. किनारपट्टीवर हलका ते मध्यम पाऊस पडेल, एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असे हवामान खात्याने जाहीर केले. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
बंगाल खोऱ्यातील कमी दाबाच्या संयोगाने पृष्ठभागाचे अभिसरण 7.6 किलोमीटर उंचीपर्यंत पसरलेले आढळले. हा कमी दाबाचा पट्टा आणखी मजबूत होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. https://mausam.imd.gov.in/
आज कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?
आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच खान्देश व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचाही यात समावेश आहे.
अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट असून धुळे, नंदुरबार, जळगाव तसेच औरंगाबाद जालना परभणी