Join us

Rain : मॉन्सून माघारीची स्थिती; पुढील पाच दिवस राज्यात पावसाचा धमाका; असे आहेत अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 7:27 PM

येत्या २५ सप्टेंबरपासून मॉन्सूूनचा पाऊस राजस्थानमधून माघारी जाण्यास अनुकुल वातावरण असून त्याचा परिणाम महाराष्ट्रात चांगला पाऊस पडण्यात होणार आहे.

राजस्थानच्या पश्चिम भागातून मॉन्सूनच्या परतीसाठी (monsoon withdrawal) पोषक वातावरण तयार झाले असून आज सायंकाळी भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार २५ सप्टेबरपर्यंत मॉन्सून राजस्थानातून परतीच्या प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे.

उत्तर-पश्चिम भारतावर कमी उष्णकटिबंधीय पातळीवर विकसित होत असलेल्या चक्रीवादळविरोधी प्रवाहामुळे आणि नैऋत्य राजस्थानच्या काही भागांमध्ये कोरडे हवामान असल्याने, 25 सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानच्या काही भागांतून नैऋत्य मान्सून माघारीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. 

अशी आहे स्थिती चक्रीवादळाचे परिवलन पश्चिम झारखंड आणि मध्य उष्णकटिबंधीय भागात आहे, तर आणखी एक कुंड सिक्कीम ते दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत बिहार ओलांडून जाते, पश्चिम झारखंड, छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, मराठवाड्यावर चक्राकार खालच्या आणि मध्यम उष्णकटिबंधीय पातळीत आहे. यामुळे राज्यात पुढील आठवडाभर पावसाचा धमाका असणार आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

असा असेल पाऊसहवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक २२ ते २६ तारखेदरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलक ते मध्यम पाऊस सर्वदूर पडण्याची शक्यता आहे. तसेच या कालावधीत गडगडाटी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक २२ ते २४ दरम्यान मराठवाडा आणि २३ आणि २६ सप्टेंबर रोजी गुजरात, तसेच पुढील 5 दिवसांत देशाच्या उर्वरित भागात विखुरलेल्या स्वरूपात हलक्या/मध्यम पावसाची शक्यता आहे.

दिनांक 22 सप्टेंबर रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात बहुतांश ठिकाणी तर दिनांक 23 सप्टेंबर रोजी औरंगाबाद व जालना जिल्हयात काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.‍  

दिनांक 24 व 25 सप्टेंबर रोजी मराठवाडयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 21 ते 27 सप्टेंबर व दिनांक 28 सप्टेंबर ते 04 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा किंचित जास्त राहण्याची शक्यता आहे.

असे आहेत अलर्टदरम्यान दिनांक २२ सप्टेंबर रोजी विदर्भातील काही भागात ऑरेंज अलर्ट असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

दिनांक २३ सप्टेंबर रोजी कोकण किनारपट्टी वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट असणार आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असून काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाटही असणार आहे.

दिनांक २४ सप्टेबर रोजी मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा, मराठवाड्यात निवडक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तिवण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दिनांका २५ सप्टेंबर रोजी विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकण आणि गोवा या भागात पावसाचा यलो अलर्ट असून निवडक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

दिनांक २६ सप्टेंबर रोजी कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. निवडक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, 

टॅग्स :पाऊसमोसमी पाऊसमोसमी पावसाचा अंदाज