Lokmat Agro >हवामान > Maharashtra rain: पावसाचा जोर वाढला, सिंधुदुर्गात रेड अलर्ट, कोल्हापूरसह या दोन जिल्ह्यांना ऑरेंज , उर्वरित ठिकाणी…

Maharashtra rain: पावसाचा जोर वाढला, सिंधुदुर्गात रेड अलर्ट, कोल्हापूरसह या दोन जिल्ह्यांना ऑरेंज , उर्वरित ठिकाणी…

Maharashtra rain: Intensity of rain has increased, red alert in Sindhudurga, orange alert for these two districts including Kolhapur, rest... | Maharashtra rain: पावसाचा जोर वाढला, सिंधुदुर्गात रेड अलर्ट, कोल्हापूरसह या दोन जिल्ह्यांना ऑरेंज , उर्वरित ठिकाणी…

Maharashtra rain: पावसाचा जोर वाढला, सिंधुदुर्गात रेड अलर्ट, कोल्हापूरसह या दोन जिल्ह्यांना ऑरेंज , उर्वरित ठिकाणी…

पुढील पाच दिवस राज्यात इथे ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाने केले जाहीर..

पुढील पाच दिवस राज्यात इथे ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाने केले जाहीर..

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Rain Update:  राज्यात आज सर्वदूर तुफान पावसाचा अंदाज देण्यात आला असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट(Red alert) देण्यात आला आहे. रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज( orange alert) तर उर्वरित सर्व राज्यात पावसाचा यलो अलर्ट(Yellow alert) हवामान विभागाने(IMD) दिला आहे.

अरबी समुद्रात उत्तरेत नैऋत्य मोसमी पाऊस पुढी सरकला असून राज्यभर मान्सून सक्रीय झाला आहे. परिणामी वादळी पावसासह विजांचा कडकडाट तसेच हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस येत्या पाच दिवसात राज्यभर राहणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विभागात मुसळधारा कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात कोकणासह मुंबईत येत्या ४ ते ५ दिवसांत वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस राहणार असून बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. येत्या तीन दिवसात पुण्याासह सातारा जिल्ह्यांमध्येही जोरधारा असतील. विदर्भात हलक्या व मध्यम सरींचा पाऊस पुढील पाच दिवस राहणार असून बहुतांश ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने, उत्तर कोंकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

https://twitter.com/RMC_Mumbai/status/1804457381935665320

कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?

रेड अलर्ट : सिंधुदुर्ग

ऑरेंज अलर्ट- रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा

यलो अलर्ट- वरील जिल्हे वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Web Title: Maharashtra rain: Intensity of rain has increased, red alert in Sindhudurga, orange alert for these two districts including Kolhapur, rest...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.