Maharashtra Latest Weather Updates : राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. उर्वरित महाराष्ट्रातही चांगला पाऊस पडताना दिसत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत मात्र पावसाचे प्रमाण कमी असल्याचं शेतकरी सांगतायेत.
आज (ता. १६ जुलै) राज्यातील कोकण भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान उर्वरित महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रातही जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
(Latest Rain Updates)
कुठे आहेत अलर्ट?
कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट दिला असून येथे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कोकणातील उर्वरित जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता असून येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही ऑरेंज अलर्ट दिला आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात येलो अलर्ट
मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांसहीत संपूर्ण मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर सांगली आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांत जोरदार आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.
इथे पडणार मुसळधार
मध्य महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि विदर्भातील बुलढाणा, अकोला आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.