Join us

Maharashtra Rain : राज्यात अजूनही पूर्णपणे परतीच्या पावसाला सुरूवात नाही! काय आहे हवामानाचा अंदाज?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 8:50 PM

Maharashtra Rain : पाऊस लांबला असून शेतीतील कामे आणि उसाचा गाळप हंगामही लांबल्याची चित्रे आहेत. पण येणाऱ्या काही दिवसांतच परतीचा पाऊस राज्यात बरसेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Maharashtra Rain : राज्यात यंदा मान्सूनच्या पावसाने दमदारपणे हजेरी लावली आहे. एकूण सरासरीच्या अधिक पाऊस पडल्याने राज्यातील शेतकरी सुखावला आहे. तर यंदाचा परतीचा पाऊस अजूनही संपूर्ण राज्यात सुरू झालेलe नाही. त्यामुळे पाऊस लांबला असून शेतीतील कामे आणि उसाचा गाळप हंगामही लांबल्याची चित्रे आहेत. पण येणाऱ्या काही दिवसांतच परतीचा पाऊस संपूर्ण राज्यात बरसेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

सध्या परतीचा पाऊस हा देशातील पंजाब, हरियाणा, हिमालय, कच्छ, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशचा काही भाग, गुजरात आणि महाराष्ट्रच्या नंदुरबार जिल्ह्यातून मान्सून परतला आहे. तर येणाऱ्या तीन दिवसांत दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यातून म्हणजेच सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि दक्षिण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातही काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने वर्तवले आहे. (Maharashtra Return Monsoon Rain Latest Updates)

पुढील तीन दिवसानंतर हळूहळू पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. पण या पावसामुळे मान्सून महाराष्ट्रातून परतण्यासाठी विलंब होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे राज्यातील नंदुरबार जिल्ह्यात परतीच्या पावसाला सुरूवात झालेली असली तरी उर्वरित राज्यात परतीच्या पावसाला सुरूवात झालेली नाही.

येणाऱ्या ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. या तीन महिन्यात मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे पण या तीन महिन्याच्या सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

टॅग्स :हवामानशेती क्षेत्र