Join us

Maharashtra Rain Update : राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस? कृषी विभागाची आकडेवारी काय सांगते?

By दत्ता लवांडे | Published: July 01, 2024 9:31 AM

Monsoon Rain Updates : राज्यात पावसाचा जोर कमी झालेला दिसतोय पण कृषी विभागाची पावसाची आकडेवारी ही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे असे दाखवते.

Maharashtra Weather and Monsoon Rain Updates :  राज्यातील मान्सूनचा पाऊस थोडा कमी झाल्याचं चित्र आहे. तर बहुतांश ठिकाणी पेरण्या थांबलेल्या आहेत. राज्यातील जवळपास ४० टक्क्यांच्या वर क्षेत्रावर पेरण्या झाल्या नसल्याने शेतकरी मान्सूनच्या जोरदार पावसाची वाट पाहत आहेत. कोकण वगळता राज्यातील सर्वच भागांत पावसाची भ्रांत असल्याचे दिसून येत आहे. 

(Monsoon Rain in Maharashtra)

दरम्यान, असे असताना कृषी विभागाची (Ahriculture Department) पावसाची आकडेवारी मात्र सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे दाखवत आहे. २८ जून अखेरच्या अहवालानुसार राज्यात सरासरीपेक्षा १०६ टक्के पाऊस झाल्याची आकडेवारी कृषी विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. पण मराठवाडा आणि विदर्भात शेतकरी आभाळाकडे टक लावून पावसाची प्रतीक्षा करत असल्याचे चित्र आहे.

कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार कोकण विभागात जून महिन्यात ६०० मिमी पाऊस पडला आहे. हा कोकणातील सरासरी पावसाच्या ९३ टक्के असल्याचे सांगण्यात येत आहे. नाशिक विभागात आत्तापर्यंत १५७ मिमी पाऊस पडला आहे. हा पाऊसही सरासरीच्या ११६ टक्के असल्याची माहिती समोर आली आहे. पुमे विभागात जून महिन्यात २०६ मिमी पाऊस पडला असून हा पाऊस सरासरीच्या १०७ टक्के आहे. 

छत्रपती संभाजीनगर विभागात १८० मिमी पाऊस पडला असून हा पाऊस सरासरीच्या १४० टक्के असल्याची माहिती कृषी  विभागाकडून मिळाली आहे. अमरावती विभागात १५६ मिमी पाऊस पडला असून ही सरासरी १०९ टक्के एवढी आहे. तर नागपूर विभागा केवळ १२३ मिमी पाऊस पडला असून येथील पावसाची सरासरी ही केवळ ६८ टक्के एवढीच असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. 

दरम्यान, राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत असताना कृषी विभागाकडून मात्र नागपूर विभाग वगळता सर्वच विभागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याची आकडेवारी प्रसिद्ध केली जात आहे.  (Latest Maharashtra Rain Updates)

टॅग्स :पाऊसशेती क्षेत्रमोसमी पाऊस