Lokmat Agro >हवामान > Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही, कारण... जाणून घ्या हवामान अंदाज              

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही, कारण... जाणून घ्या हवामान अंदाज              

Maharashtra Rain Update now no chance of rain in Maharashtra, Know the weather forecast               | Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही, कारण... जाणून घ्या हवामान अंदाज              

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही, कारण... जाणून घ्या हवामान अंदाज              

Maharashtra Rain Update : सध्या ऑक्टोबर हिटचा प्रभाव अजूनही जाणवतोच, पण लवकरच थंडीचीही चाहूल लागू शकते. आणि पाऊस..

Maharashtra Rain Update : सध्या ऑक्टोबर हिटचा प्रभाव अजूनही जाणवतोच, पण लवकरच थंडीचीही चाहूल लागू शकते. आणि पाऊस..

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Rain Update : सध्या ऑक्टोबर हिटचा (October Hit) प्रभाव अजूनही जाणवतोच, पण लवकरच थंडीचीही चाहूल लागू शकते. सध्या महाराष्ट्रात दुपारचे कमाल तापमान कोकण, मध्य महाराष्ट्रात सरासरी इतके तर विदर्भ मराठवाड्यात सरासरीपेक्षा २ डिग्री से. ग्रेड ने अधिक म्हणजे ३३ डिग्री से. ग्रेड च्या आसपास आहे.
            
तसेच पहाटेचे किमान तापमान मात्र विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra Rain) सरासरीपेक्षा ४ डिग्री से. ग्रेड ने अधिक म्हणजे २१ डिग्री से. ग्रेड च्या आसपास आहे. त्यामुळे ढगाळ वातावरणासहित अजुन ऑक्टोबर हिटचा परिणाम महाराष्ट्रात अजुन ३ ते ४ दिवस म्हणजे सोमवार दि. ४ नोव्हेंबरपर्यंत टिकून राहण्याची शक्यता जाणवते. 

परंतु वायव्यई व पूर्व भारतात, उद्यापासून पुढील पाच दिवस पहाटेचे किमान (Temprature) तापमानात अंदाजे २ ते ३ डिग्री से. ग्रेड ने घट होण्याच्या शक्यतेमुळे, मंगळवार दि. ५ नोव्हेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रातही निरभ्र आकाशासहित पहाटेचे किमान तापमानात सध्यापेक्षा हळूहळू ५ डिग्री से.ग्रेड ने खालावून १५ ते १६ डिग्री से. ग्रेड पर्यन्त खाली घसरण होवु शकते, असे वाटते. त्यामुळे मंगळवार दि. ५ नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात जोरदार नव्हे पण हळूहळू थंडीची काहीशी अपेक्षा करू या! सध्या तरी महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही. 

- माणिकराव खुळे.
Meteorologist (Retd)
IMD Pune.

Web Title: Maharashtra Rain Update now no chance of rain in Maharashtra, Know the weather forecast              

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.